Monday, May 15, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 13

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 13

     (भाग 12)               (भाग 14) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

1201.   He became very famous.तो खूप प्रसिद्ध झाला.

1202.   You're too noisy.तू खूप आवाज करतोस.तू खूप आवाज करतेस.

1203.   I admit my mistake.मी माझी चूक मान्य करतो.मी माझी चूक मान्य करते.

1204.   Sharad wants a mechanic.शरदला मेकॅनिक हवा आहे.

1205.   What an opportunity! काय संधी आहे!

1206.   Nanda is irresponsible.नंदा बेजबाबदार आहे.

1207.   This is my new house.हे माझे नवीन घर आहे.

1208.   Raju always believes me.राजू नेहमी माझ्यावर विश्वास ठेवतो.

1209.   He was a great singer. तो उत्तम गायक होता .

1210.   We need people like this. आम्हाला अशा लोकांची गरज आहे.आपल्याला अशा लोकांची गरज आहे.

1211.   I don't feel like talking.मला बोलावंसं वाटत नाही.

1212.   Somebody is in our field.आपल्या शेतामध्ये कोणीतरी आहे.

1213.   Both sides are correct.दोन्ही बाजू बरोबर आहेत.

1214.   The bathroom's on the right. बाथरूम उजव्या बाजूला आहे.बाथरूम उजवीकडे आहे.

1215.   Ramesh kept talking all night.रमेश रात्रभर बोलत राहिला.

1216.   Bharat won't ask for help.भरत मदत मागणार नाही.

1217.   I was there last night. काल रात्री मी तिथे होतो.

1218.   Your Hindi is good.तुमची हिन्दी चांगली आहे.

1219.   They're playing chess.ते बुद्धिबळ खेळत आहेत.

1220.   How is Naresh these days? नरेश आजकाल कसा असतो?

1221.   Rita is just like you. रीता अगदी तुझ्यासारखी आहे.

1222.   I live in a big city.मी एका मोठ्या शहरात राहतो.मी एका मोठ्या शहरात राहते .

1223.   Whose pen is this?हा कोणाचा पेन आहे

1224.   Sarita needs your book.सरिताला तुझे पुस्तक हवे आहे.

1225.   Let's play Cricket.चला क्रिकेट खेळूया.

1226.   You have two Pencils.तुझ्याकडे दोन पेन्सिल आहेत.तुमच्याकडे दोन पेन्सिल आहेत.

1227.   They don't need us. त्यांना आपली गरज नाही.त्यांना आमची गरज नाही.

1228.   Is this your house? हे तुझं घर आहे का?

1229.   Does Satish help Shankar? सतीश शंकरला मदत करतो का

1230.   Ram knew all that.रामला ते सगळं माहीत होतं.

1231.   I'm watching this.मी हे पाहत आहे.

1232.   This is my dog. हा माझा कुत्रा आहे.

1233.   Did they feed you? त्यांनी तुम्हाला भरवलं का? त्यांनी तुला भरवलं का?

1234.   I'll wait outside.मी बाहेर थांबेन.मी बाहेर जाऊन वाट बघते.

1235.   That's my mother.ती माझी आई आहे.

1236.   Radha was very poor.राधा खूप गरीब होती.

1237.   You are important.तू महत्त्वाचा आहेस.तुम्ही महत्त्वाचे आहात.

1238.   Go ask your father.जाऊन आपल्या वडिलांना विचार.जाऊन आपल्या वडिलांना विचारा.

1239.   I was up all night.मी रात्रभर जागा होतो.मी रात्रभर जागी होते.

1240.   My wallet is black.माझे पाकीट काळे आहे.

1241.   That's all we want.आम्हाला एवढेच हवे आहे. आपल्याला एवढेच हवे आहे.

1242.   Ganesh is my neighbor.गणेश माझा शेजारी आहे.

1243.   We're contributing.आम्ही योगदान देत आहोत.आपण योगदान देत आहोत.

1244.   Who made the rules? नियम कोणी बनवले?

1245.   Bring me some water.मला थोडे पाणी आण.मला थोडे पाणी आणा.

1246.   He accepted my idea.त्याने माझी कल्पना मान्य केली.त्यांनी माझी कल्पना स्वीकारली.

1247.   I haven't forgotten.मी विसरलो नाही.

1248.   I study Marathi here.मी इथे मराठीचा अभ्यास करतो.मी इथे मराठीचा अभ्यास करते.

1249.   I'm living here now.मी आता इथे राहतो आहे.मी आता इथे राहते आहे.

1250.   It isn't attractive.ते आकर्षक नाही.

1251.   My wife is Punjabi. माझी पत्नी पंजाबी आहे.माझी बायको पंजाबी आहे.

1252.   Sharda plays the piano. शारदा पिआनो वाजवते.

1253.   Did you say something? तू काही म्हणालास का? तुम्ही काही म्हणालात का?

1254.   He works in a shop.तो एका दुकानात काम करतो.

1255.   My bag is very heavy.माझी बॅग खूप जड आहे.

1256.   We just wanted to win.आम्हाला फक्त जिंकायचं होतं.आपल्याला फक्त जिंकायचं होतं.

1257.   Where are my car keys? माझ्या गाडीच्या चाव्या कुठे आहेत?

1258.   Are you sure it was me? तुम्हाला खात्री आहे की तो मीच होतो? तुला खात्री आहे की तो मीच होतो?  

1259.   He has left his family. त्याने आपलं कुटुंब सोडले आहे.

1260.   That's why I came late.म्हणूनच मी उशीरा आलो.त्यामुळे मी उशीरा आलो.

1261.   Asha put down the phone.आशाने फोन खाली ठेवला.

1262.   Who wrote this article? हा लेख कोणी लिहिला?

1263.   Everyone makes mistakes.प्रत्येकजण चुका करतो.

1264.   Shanta has just come home.शांता नुकतीच घरी आली आहे.

1265.   Dinesh has lots of clothes.दिनेशकडे भरपूर कपडे आहेत.

1266.   Your horse is beautiful.तुझा घोडा सुंदर आहे.तुमचा घोडा सुंदर आहे.

1267.   Don't tell me to go home. मला घरी जायला सांगू नकोस.मला घरी जायला सांगू नका.

1268.   I wasn't laughing at you.मी तुझ्यावर हसत नव्हतो.मी तुझ्यावर हसत नव्हते.

1269.   This temple is ancient.हे मंदिर प्राचीन आहे.

1270.   Where did you find these? हे तुला कुठे सापडले? तुम्हाला हे कुठे सापडले?

1271.   I don't have a coat. माझ्याकडे कोट नाही.

1272.   I like your country a lot.मला तुझा देश खूप आवडतो.मला तुमचा देश खूप आवडतो.

1273.   Let's meet this afternoon.आज दुपारी भेटूया.

1274.   Ritu doesn't want to leave.रितूला निघावसं वाटत नाही.

1275.   What's your sister's name? तुझ्या बहिणीचं नाव काय आहे?

1276.   When did it begin to rain? पाऊस कधी सुरू झाला?

1277.   Have you ever driven a bicycle? तू कधी सायकल चालवली आहेस का? तुम्ही कधी सायकल चालवली आहे का?

1278.   It only weights 5 kilograms.त्याचे वजन फक्त ५ किलो आहे.

1279.   He stretched out his legs. त्याने त्याचे पाय पसरले.

1280.   Ramu calls Dinesh every night.रामू रोज रात्री दिनेशला फोन करतो.

1281.   Ram finally said something.राम शेवटी काहीतरी बोलला.

1282.   Karim knew that I was scared.मी घाबरलोय हे करीमला माहीत होतं.मी घाबरलेय हे करीमला माहीत होतं.

1283.   Shankar sells flowers.शंकर फुलं विकतो.

1284.   You aren't needed.तुझी गरज नाही.तुमची गरज नाही. 

1285.   How are you coming? तू कसा येत आहेस? तू कशी येत आहेस? तुम्ही कसे येत आहात?

1286.   I won't forget you.मी तुला विसरणार नाही.मी तुम्हाला विसरणार नाही.

1287.   This is a rectangle.हा आयत आहे.

1288.   He suddenly stopped.तो अचानक थांबला.

1289.   My phone rang again.माझा फोन पुन्हा वाजला.

1290.   Where's your father? तुझे वडील कोठे आहेत?

1291.   Can I turn on the TV? मी टीव्ही चालू करू शकतो का?

1292.   We went to the river.आम्ही नदीकडे गेलो.

1293.   I signed the contract.मी करारावर सही केली.

1294.   The train has arrived.ट्रेन आली आहे.

1295.   Winning is never easy.जिंकणं कधीच सोपं नसतं.

1296.   Kavita is a member.कविता सदस्य आहे.

1297.   We're neighbors.आम्ही शेजारी आहोत.आपण शेजारी आहोत.

1298.   This is illegal. हे बेकायदेशीर आहे. 

1299.   Ram's my nephew.राम माझा भाचा आहे.

1300.   What did he say? तो काय म्हणालात्याने काय म्हटलं?  

       (भाग 12)                  (भाग 14)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...