Wednesday, May 10, 2023

Vakprachar,वाक्प्रचार आणि अर्थ

Vakprachar,वाक्प्रचार आणि अर्थ 

 
vakprachar
vakprachar

1.  अंग काढून घेणे - संबंध तोडणे.

2.  अंग चोरणे फारच होडे काम करणे.

3.  अंग धरणे - लठ्ठ होणे.

4.  अंगवळणी पडणे सवय होणे.

5.  अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे.

6.  अंगाची लाही होणे अतिशय संताप होणे,खूप राग येणे.

7.   अंगात वीज संचारणे अचानक बळ येणे.

8.   अंगाला होणे - अंगाला छान बसणे.

9.   अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे.

10.  अंगावर काटा येणे - भीती वाटणे.

11.  अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

12.  अंगावर शेकणे नुकसान सोसावे लागणे.

13.  अंगी ताठा भरणेमगरुरी करणे.

14.  अंगी बाणणे मनात खोलवर रुजणे.

15.  अंथरूण पाहून पाय पसरणेऐपतीनुसार खर्च करणे.

16.  अग्निदिव्य करणे- कठीण कसोटीला उतरणे.

17.  अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे.

18.  अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे.

19.  अट्टहास करणे - आग्रह धरणे.

20.  अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस.

21.  अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे.

22.  अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे.

23.  अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.

24.  अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे.

25.  अनमान करणे - संकोच करणे.

26.  अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे.

27.  अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.

28.  अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

29.  अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.

30.  अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.

31.  अभंग असणे - अखंड असणे.

32.  अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.

33.  अमलात आणणे - कारवाई करणे.

34.  अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे.

35.  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे.

36.  अवाक् होणेआश्चर्यचकित होणे.

37.  आंदण देणे - देऊन टाकणे.

38.  आंबून जाणेविटून जाणे,थकणे.

39.  आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे.

40.  आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.

41.  आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे.

42.  आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे.

43.  आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट.

44.  आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

45.  आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

46.  आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

47.  आच लागणे - झळ लागणे.

48.  आड येणे - अडथळा निर्माण करणे.

49.  आडाखे बांधणे- मनात आराखडा किंवा अंदाज करणे.

50.  आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे.

51.  आत्मसात करणेमिळवणे,अंगी बाणणे.

52.  आपल्या पोळीवर तूप ओढणे साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.

53.  आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे.

54.  आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे.

55.  आयोजित करणे - सिद्धता करणे.

56.  आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे.

57.  इतिश्री करणे - शेवट करणे.

58.  उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील होता सल्ले देणे, मनापासून काम करणे,दूरवरून निर्देश देणे.

59.  उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती.

60.  उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.

61.  उखाळ्या-पाखाळ्या काढणेएकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे.

62.  उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.

63.  उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे.

64.  उताणा पडणे - पराभूत होणे.

65.  उत्पात करणे - विध्वंस करणे.

66.  उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.

67.  उदास होणे - खिन्न होणे.

68.  उद्ध्वस्त होणे- नाश पावणे.

69.  उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे.

70.  उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.

71.  उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे.

72.  उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे.

73.  उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.

74.  उष्ट्या हाताने कावळा हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत करणे.

75.  उसंत मिळणे - वेळ मिळणे.

76.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.

77.  ऊर भरून येणे गदगदून येणे.

78.  ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे.

79.  एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.

80.  ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे.

81.  ओढा असणे - कल असणे.

82.  अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे.

83.  ओनामा- प्रारंभ.

84.  कंठ दाटून येणे गहिवरून येणे.

85.  कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

86.  कंठस्नान घालणे- ठार मारणे.

87.  कंपित होणे- थरथरणे,थरथर कापणे.

88.  कंबर कसणे जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

89.  कच्छपी लागणे - नादी लागणे.

90.  कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे.

91.  कणव असणे- आस्था किंवा करुणा असणे.

92.  कणीक तिंबणे - खूप मार देणे.

93.  कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.

94.  कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे.

95.  कपाळाला हात लावणे हताश होणे,निराश होणे.

96.  कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे.

97.  कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे.

98.  कहर करणे - अतिरेक करणे.

99.  काकदृष्टीने पाहाणे अतिशय बारकाईने तीक्ष्ण नजरेने पाहाणे.

100. काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

101. कागदी घोडे नाचविणे फक्त लेखनात शूरपणा दाखविणे.

102.काट्याचा नायटा होणेक्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

103.काट्याने काटा काढणे एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे.

104.काढता पाया घेणे विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे.

105. काणाडोळा करणे- दुर्लक्ष करणे.

106.कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.

107. कान उपटणे कडक शब्दात समज देणे.

108.कान टोचणे खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.

109. कान निवणे ऐकून समाधान होणे.

110. कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे.

111. कानउघाडणी करणे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे.

112.कानशिलांची भजी होणे गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे.

113.कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.

114. कानाने हलका असणे काशावरही पटकन विश्वास ठेवणे.

115. कानावर घालणे लक्षात आणून देणे.

116. कानावर हात ठेवणे नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे.

117. कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे.

118. कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे.

119. कारवाया करणे कट करणे,कारस्थाने करणे.

120.काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे.

121. काळजी घेणे चिंता वाहने,आस्था असणे.

122. काळीज उडणे - भीती वाटणे.

123. काळ्या दगडावरची रेघ - खोटे ठरणारे शब्द.

124.काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे.

125. कावराबावरा होणेबावरणे.

126. किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.

127. कुंपणाने शेत खाणे ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

128. कुणकुण लागणे - चाहूल लागणे.

129. कुत्रा हाल खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.

130. कूच करणे - वाटचाल करणे.

131. केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे.

132. कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.

133. कोडकौतुक होणे - लाड होणे.

134. कोपरापासून हात जोडणे काहीही संबंध राहण्याची इच्छा प्रकट करणे.

135.खंड पडणे - एखादे कार्य करताना मध्ये थांबणे.

136. खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे.

137. खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे.

138. खडे फोडणे - दोष देणे.

139. खपणे कष्ट करणे,झिजणे.

140. खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे.

141. खसखस पिकणे - मोठ्याने हसणे.

142. खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे.

143. खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

144. खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला मिळणे.

145. खाल्ल्या घरचे वासे मोजणे- उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे.

146. खितपत पडणे - क्षीण होत जाणे.

147. खूणगाठ बांधणे - निश्चय करणे.

148. खो घालणे- विघ्न निर्माण करणे.

149. गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे.

150. गट्टी जमणे - दोस्ती होणे.

151. गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे.

152. गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.

153. गळ घालणे - अतिशय आग्रह करणे.

154. गळ्यात गळा घालणे खूप मैत्री करणे.

155. गळ्यात घोंड पडणे- इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.

156. गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने.

157. गळ्यातील ताईत होणे अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे.

158. गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे.

159. गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

160. गाडी अडणे खोळंबा होणे.

161. गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.

162. गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे.

163. गुजराण करणे - निर्वाह करणे.

164.  गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे.

165. गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे.

166. गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे.

167. गौडबंगाल असणे गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे.

168. ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे.

169. घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.

170. घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे.

171. घर धुऊन नेणे- सर्वस्वी लुबाडणे.

172. घागरगडचा सुभेदार पाणक्या.

173. घाम गाळणे - खूप कष्ट करणे.

174. घालून पाडून बोलणे- दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

175. घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात घेता केवळ पाठांतर करणे.

176. घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.

177. घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.

178. घोडे मारणे - नुकसान करणे.

179. चंग बांधणे निश्चय करणे.

180. चक्कर मारणे - फेरफटका मारणे.

181. चतुर्भुज होणे - लग्न करणे.

182. चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे.

183. चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.

184. चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे.

185. चाहूल लागणे - मागोवा लागणे.

186. चितपट करणेकुस्तीत हरविणे.

187. चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे.

188. चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे अनाथ करणे.

189. चीतपट करणे- कुस्तीत हरविणे.

190. चुरमुरे खात बसणे - खजील होणे.

191. चेहरा खुलणे - आनंद होणे.

192. चौदावे रत्न दाखवणे - मार देणे.

193. छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे.

194. छाननी करणे - तपास करणे.

195. जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे.

196. जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे.

197. जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

198. जळफळाट होणे - रागाने लाल होणे.

199. जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे.

200. जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.

201. जिवाचा धडा करणे पक्का निश्चय करणे.

202. जिवाची मुंबई करणे- अतिशय चैनबाजी करणे.

203. जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे.

204.जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे.

205. जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे.

206. जीभ सैल सोडणे वाटेल तसे बोलणे.

207. जीव अधीर होणे - उतावीळ होणे.

208. जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.

209. जीव खाली पडणे काळजीतून मुक्त होणे.

210. जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे.

211. जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे.

212. जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे.

213. जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे.

214. जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे.

215. जीव वरखाली होणेघाबरणे.

216. जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे.

217. जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.

218. जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.

219. जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे.

220. जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे.

221. ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे.

222. झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.

223. झाकले माणिकसाधा,पण गुणी मनुष्य.

224. झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे.

225. टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे.

226. टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत रहाणे.

227. टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.

228. टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे.

229. टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे.

230. ठसा उमटवणे - छाप पाडणे.

231. ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे.

232. डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे.

233. डाळ शिजणेथारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे.

234. डाव येणे - खेळात राज्य येणे.

235. डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.

236. डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे.

237.  डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

238.  डोक्यावर घेणे - अति लाड करणे.

239. डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.

240. डोळा असणे पाळत ठेवणे.

241. डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे.

242. डोळे उघडणे अनुभवाने सावध होणे.

243. डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे.

244. डोळे दिपवले - थक्क करून सोडणे.

245. डोळे निवणे - समाधान होणे.

246.डोळे पांढरे होणे मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे.

247. डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे.

248. डोळे फिरणे  - खूप घाबरणे.

249. डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे.

250. डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे.

251. डोळे वटारणे - रागाने बघणे.

252. डोळेझाक करणे दुर्लक्ष करणे.

253. डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे.

254. डोळ्यांत खुपणे - सहन होणे.

255. डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे.

256. डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.

257. डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.

258. डोळ्यांस धारा लागणे अश्रू वाहणे,रडणे.

259. डोळ्यात अंजन घालणे चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.

260. डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे.

261.  डोळ्यातून थेंब काढणे दु:खद प्रसंग असूनही रडणे.

262.  डोळ्याला डोळा भिडवणे - घाबरून नजर देणे.

263.  तगादा लावणेपुन्हा:पुन्हा मागणी करणे.

264.  तजवीज करणे - तरतूद करणे.

265.  तडीस नेणे - पूर्ण करणे.

266. तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.

267. तळहातावर शिर घेणे- जिवावर उदार होणे.

268. ताट वाढणे - जेवायला वाढणे.

269. ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे.

270. तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

271. तारांबळ होणे - घाईगडबड उडणे.

272. ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे.

273. तिलांजली देणेसोडणे,त्याग करणे.

274.  तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे.

275. तोंड काळे करणे- नाहीसे होणे,दृष्टीआड होणे.

276. तोंड टाकणे अद्वातद्वा बोलणे.

277. तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे.

278. तोंड फिरवणे नाराजी व्यक्त करणे.

279. तोंड भरून बोलणे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे.

280. तोंड सांभाळून बोलणे जपून बोलणे.

281. तोंडघशी पाडणे विश्वासघात होणे,अडचणीत येणे.

282. तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे.

283. तोंडसुख घेणे दोष देताना वाट्टेल तसे बोलणे.

284. तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.

285. तोंडाला पाणी सुटणे हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे.

286. तोंडाला पाने पुसणेफसवणे.

287. तोंडावाटे ' ब्र ' काढणे- एकही शब्द उच्चारणे.

288.  तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे.

289. तोंडून अक्षर फुटणे- घाबरून बोलणे.

290. राटिका - कजाग बायको.

291. थांग लागणे - कल्पना येणे.

292. थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.

293. दक्षता घेणे - काळजी घेणे.

294. दगडावरची रेघ - खोटे ठरणारे शब्द.

295. दगा देणे फसवणे.

296. दडी मारणे - लपून राहणे.

297. दत्त म्हणून उभे राहणे - एकाएकी हजर होणे.

298. दप्तरी दाखल होणे - संग्रही जमा होणे.

299.  दबा धरून बसणे - टपून बसणे.

300. दाढी धरणे - विनवणी करणे.

301. दात ओठ खाणे चीड व्यक्त होणे, द्वेषाची भावना दाखवणे.

302. दात धरणे - वैर बाळगणे.

303. दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे, बोलती बंद होणे.

304. दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे.

305. दातास दात लावून बसणे - काही खाता उपाशी राहणे.

306. दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे.

307. दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे.

308. दिवस बुडून जाणे - सूर्य मावळणे.

309. दिशा फुटेल तिकडे पडणे - सैरावैरा पळणे.

310. दुःखावर डागण्या देणे दु:खी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे.

311. दुधात साखर पडणे अधिक चांगले घडणे.

312. दुमदुमून जाणे - निनादून जाणे.

313. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे - दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

314. देखभाल करणे - जतन करणे.

315. देखरेख करणे - राखण करणे.

316. देणेघेणे नसणे - संबंध नसणे.

317. देहातून प्राण जाणे - मरण येणे.

318. दोन हातांचे चार हात होणे - विवाह होणे.

319. द्राविडी प्राणायाम करणे - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

320.धडपड करणे - खूप कष्ट करणे.

321.धन्य होणे - कृतार्थ होणे.

322. धरणे धरणे हट्ट धरून बसणे.

323. धाबे दणाणणे - खूप घाबरणे.

324. धारवाडी काटा - बिनचूक वजनाचा काटा.

325. धारातीर्थी पडणे - रणांगणावर मृत्यू येणे.

326. धास्ती घेणे - धक्का घेणे,घाबरणे.

327. धिंडवडे निघणे - फजिती होणे.

328. धुडगूस घालणे - गोंधळ करणे.

329. धूम ठोकणे - वेगाने पळून जाणे.

330. धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.

331.  नक्राश्रू ढाळणे - अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे.

332. नक्षा उतरवणे - गर्व उतरवणे.

333. नजर करणे - भेटवस्तू देणे.

334. नजर वाकडी करणे - वाईट हेतू बाळगणे.

335. नजरेत भरणे - उठून दिसणे.

336. नसती बिलामत येणे - नसती कटकट ओढवणे.

337.  नांगी टाकणे - हातपाय गाळणे.

338.  नाक कापणे घोर अपमान करणे.

339. नाक खुपसणे नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे.

340.  नाक घासणे - स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

341.  नाक ठेचणे नक्षा  उतरवणे.

342.  नाक मुठीत धरणे - अगतिक होणे.

343.  नाक मुरडणे - नापसंती दाखवणे.

344.  नाक वर असणे ऐट,दिमाख किंवा ताठा असणे.

345.  नाकाने कांदे सोलणेस्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे.

346.  नाकाला मिरच्या झोंबणे - एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे.

347.  नाकावर राग असणे - लवकर चिडणे.

348.  नाकाशी सूत धरणे - आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे.

349.  नाकी नऊ येणे फार दगदग होणे,मेटाकुटीला येणे,फार त्रास होणे.

350.  नाळ तोडणे - संबंध तोडणे.

351.  नाव कमावणे - कीर्ती मिळवणे.

352. निक्षून सांगणे - स्पष्टपणे सांगणे.

353.  निद्राधीन होणेझोपणे.

354.  निवास करणेरहाणे.

355. निष्प्रभ करणे - महत्व कमी करणे.

356.  नूर पातळ होणे - रूप उतरणे.

357.   पडाव पडणे - वस्ती करणे.

358.  पदरमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे.

359.  पदरात घालने चूक पटवून देणे,स्वाधीन करणे.

360.  पदरात घेणे स्वीकारणे.

361.  पराचा कावळा करणे - मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे.

362.  परिपाठ असणे - विशिष्ट पद्धत असणे,नित्यक्रम असणे.

363.  परिसीमा गाठणे परकोटीला जाणे.

364.  पसंती मिळणे - अनुकूलता लाभणे.

365.  पहारा देणे - राखण करणे.

366.  पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने जाणे.

367.  पाचवीला पुजणे - त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे, एखादी गोष्ट जन्मापासून असणे.

368.   पाठ थोपटणे शाब्बासकी देणे,कौतुक करणे.

369.  पाठ दाखवणे - पळून जाणे.

370.  पाठ सोडणे - एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे.

371.  पाठिंबा देणे - दुजोरा देणे.

372.   पाठीशी घालने - संरक्षण देणे.

373.  पाढा वाचणे - सविस्तर हकीकत सांगणे.

374.  पाणी पडणे - वाया जाणे.

375.  पाणी पाजणे - पराभव करणे.

376.  पाणी मुरणे - कपटाने काहीतरी लपवून ठेवणे,गुप्त कट शिजवत असणे.

377.  पाणी सोडणे - आशा सोडणे.

378.  पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे.

379.   पादाक्रांत करणे जिंकणे.

380.  पाय मोकळे करणे फिरायला जाणे.

381.  पायमल्ली करणे - उपमर्द करणे.

382.  पायाखाली घालने - पादाक्रांत करणे.

383.  पार पाडणे - सांगता करणे,संपवणे,संपन्न होणे,संपवणे,सांगता करणे.

384.  पाळत ठेवणे - लक्ष ठेवणे.

385.  पाळी येणे - वेळे येणे.

386.  पाहुणचार करणे - आदरातिथ्य करणे.

387.  पिंक टाकणे थुंकणे.

388.  पुंडाई करणे - दांडगाईने वागणे.

389.  पुढाकार घेणे - नेतृत्व करणे.

390.  पुनरुज्जीवन करणे - पुन्हा उपयोगात आणणे.

391.  पोटाची दमडी वळणे - खायला मिळणे.

392.  पोटात कावळे ओरडणे -  भुकेने व्याकूळ होणे.

393.  पोटात कावळे काव काव करणे - अतिशय भूक लागणे.

394.  पोटात घालणे - क्षमा करणे.

395.  पोटात ठेवणे गुपित सांभाळणे.

396.  पोटात ब्रह्मराक्षस उठणे - खूप खावेसे वाटणे.

397.  पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे.

398.  पोटाला चिमटा घेणे - पोटाला खाता राहणे.

399.  पोटावर पाय देणे रोजंदारी बंद करणे,उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे.

400. प्रक्षेपित करणे - प्रसारित करणे.

401. प्रघात पडणे - रीत असणे.

402. प्रचारात आणणे - जाहीरपणे माहिती देणे.

403. प्रतिकार करणे - विरोध करणे.

404. प्रतिबंध करणे - अटकाव करणे.

405. प्रतिष्ठा लाभणे - मान मिळणे.

406. प्रतिष्ठापित करणे- स्थापना करणे.

407.  रत्यय येणे - प्रचीती येणे.

408.   रभावित होणे छाप पडणे.

409. प्रश्नांची सरबत्ती करणे - एकसारखे प्रश्न विचारणे.

410.  प्रस्ताव ठेवणे - ठराव मांडणे.

411.  प्राण कानांत गोळा होणे - ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे.

412.  राणाला मुकणे - जीव जाणे,मरण येणे.

413.  प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा करणे.

414.  प्राप्त करणेमिळवणे.

415.  प्रेरणा मिळणे - स्फूर्ती मिळणे.

416.  फंदात पडणे - भानगडीत अडकणे.

417.  फटफटणे - सकाळ होणे.

418.  फाटे फोडणे - उगाच अडचणी निर्माण करणे.

419.   फिदा होणे - खुश होणे.

420. फुटाण्यासारखे उडणे - झटकन राग येणे.

421.  बट्ट्याबोळ होणे - विचका होणे.

422.  बडेजाव वाढवणे - प्रौढी मिरवणे.

423. बत्तरबाळ्या होणे - चिंध्या होणे,नासधूस होणे.

424.  बत्तरबाळ्या होणे- नासधूस होणे,चिंध्या होणे.

425.  बत्तीशी रंगवणे - जोराने थोबाडीत मारणे.

426. बळ लावणे - शक्ती खर्च करणे.

427.  बस्तान ठोकणे - मुक्काम ठोकणे.

428. बहिष्कार टाकणे - वाळीत टाकणे नकार देणे.

429.  बांधणी करणे - रचना करणे.

430.  बाजारगप्पानिंदा नालस्ती.

431.  बादरायण संबंध असणे - ओढून ताणून लावलेला संबंध असणे.

432. बारा गावचे पाणी पिणे - विविध प्रकारचे अनुभव घेणे.

433. बारा वाजणे - पूर्ण नाश होणे.

434. बावरणेगोंधळणे.

435. बाहू स्फुरण पावणे - स्फूर्ती येणे.

436. बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे.

437.  बेत आखणे - योजना आखणे.

438.  बेत करणे - योजना आखणे.

439. बेत हाणून पाडणे - बेत सिद्धीला जाऊ देणे.

440. बोचणी लागणे - एखादी गोष्ट मनाला लागून राहणे.

441. बोटावर नाचवणे - आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.

442. बोल लावणे - दोष देणे.

443. बोला फुलाला गाठ पडणे - दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे.

444. बोळ्याने दूध पिणे - बुद्धिहीन असणे.

445. ब्रभ्रा करणे - बोभाटा करणे,सगळीकडे प्रसिद्ध करणे.

446. भंडावून सोडणे - त्रास देणे.

447. भगीरथ प्रयत्न करणे - चिकाटीने प्रयत्न करणे.

448. भडभडून येणे - हुंदके देणे,गलबलणे.

449. भरभराट होणे - प्रगती होणे,समृद्धी होणे.

450. भरारी मारणे - झेप घेणे.

451. भाऊबंदकी असणे - नात्यानात्यात भांडण असणे.

452. भान ठेवणे - जाणीव ठेवणे.

453. भान नसणे - जाणीव नसणे.

454. भानावर येणे - परिस्थितीची जाणीव होणे,शुद्धीवर येणे.

455. भारून टाकणे - पूर्णपणे मोहून टाकणे.

456. भ्रमण करणे - भटकंती करणे.

457.  मती गुंग होणे - आश्चर्य वाटणे.

458. मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे.

459. मधून विस्तव जाणे - अतिशय वैर असणे.

460.  मन मोकळे करणे - सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे.

461.  मन सांशक होणे - मनात संशय वाटू लागणे.

462. मनात घर करणे - मनात कायमचे राहणे.

463. मनात मांडे खाणे - व्यर्थ मनोराज्य करणे.

464. मनाने घेणे - मनात पक्का विचार येणे.

465.  मनावर ठसणे - मनावर जोरदारपणे बिंबणे.

466. मनावर बिंबवणे - मनावर ठसवणे.

467. मनोरथ पूर्ण होणे - इच्छा पूर्ण होणे.

468. मशागत करणे - मेहनत करून निगा राखणे.

469. मांडीवर घेणे दत्तक घेणे.

470. मागमूस नसणे - थांगपत्ता नसणे.

471.मात करणे - विजय मिळवणे.

472. मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे.

473.मान ताठ ठेवणे स्वाभिमानाने वागणे.

474. मान्यता पावणे - सिद्ध होणे.

475. माशा मारणे - कोणताही उद्योग करणे.

476. माशी शिंकणे - अडथळा येणे.

477.  मिनतवारी करणेदादा-पुता करणे.

478. मिशांना तूप लावणे - उगीच ऐट दाखवणे.

479. मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे.

480. मुखोद्गत असणे तोंडपाठ असणे.

481. मूग गिळणे - उत्तर देता गप्प राहणे.

482. मोहाला बळी पडणे - एखाद्या गोष्टीच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे.

483. यक्षप्रश्न असणे - महत्त्वाची गोष्ट असणे.

484. योगक्षेम चालविणे - रक्षणाची काळजी वाहणे.

485. रक्ताचे पाणी करणे - अतिशय मेहनत करणे.

486. रक्षणाची काळजी घेणे - योगक्षेम चालविणे.

487. रवाना होणे - निघून जाणे.

488. रस असणे - अत्यंत आवड असणे.

489. राईचा पर्वत करणे क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे.

490. राख होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

491. राब राब राबणे - सतत खूप मेहनत करणे.

492. राबता असणे - सतत ये-जा असणे.

493. राम नसणे - अर्थ नसणे.

494.  राम म्हणणे - शेवट होणे,मृत्यू येणे.

495. रियाज करणे - सराव करणे.

496. रुची निर्माण होणे - गोडी निर्माण होणे.

497. रोष ठेवणे - नाराजी असणे,चीड येणे.

498.  लक्ष वेधून घेणे - लक्ष ओढून घेणे.

499.  लक्ष्मीचा वरदहस्त असणे - लक्ष्मीची कृपा असणे,श्रीमंती असणे.

500. ललकारी देणे - जयघोष करणे.

501. लळा लागणे - ओढ वाटणे.

502. लवलेश नसणे - जराही पत्ता नसणे,जराही उरणे.

503. लष्कराच्या भाकर्‍या भाजणे - दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे.

504. लष्टक लावणे - झंझट लावणे,निकड लावणे.

505. लहान तोंडी मोठा घास घेणे - आपणास शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे.

506. लांछनास्पद असणेलाजिरवाणे असणे.

507. लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे.

508. वंचित रहाणे - एखादी गोष्ट मिळणे.

509. वकीलपत्र घेणे - एखाद्याची बाजू घेणे.

510. वजन पडणे प्रभाव पडणे.

511.  वठणीवर आणणे - ताळ्यावर आणणे.

512. वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकाचा राग दुस-यावर काढणे.

513. वणवण करणे - खूप भटकणे.

514. वणवण भटकणे - एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे.

515. वरदान देणे - कृपाशीर्वाद देणे.

516.  वाचा बंद होणे - तोंडातून एक शब्दही बाहेर पडणे.

517.  वाचा बसणे - एक शब्दही बोलता येणे.

518.  वाट तुडवणे - रस्ता कापणे.

519.  वाट लावणे - विल्हेवाट लावणे,मोडूनतोडून टाकणे.

520. वाटाण्याच्या अक्षता लावणे - स्पष्टपणे नाकारणे.

521.  वारसा देणे - वडिलोपार्जित हक्क सोपवणे.

522. विचलित होणे - मनाची चलबिचल होणे.

523. विडा उचलणे - निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

524. विदीर्ण होणे - भग्न होणे,मोडतोड होणे.

525. विपर्यास होणे असंगत अर्थ लावणे.

526. विरस होणे - निराशा होणे,उत्साहभंग होणे.

527.  विरोध दर्शवणे - प्रतिकार करणे.

528.  विसंवाद असणे - एकमेकांशी जमणे.

529. विसावा घेणे - विश्रांती घेणे.

530. विहरणे - संचार करणे.

531. वेड घेऊन पेडगावला जाणे - मुद्दाम ढोंग करणे.

532. वेसण घालणे - मर्यादा घालणे.

533. व्रत घेणे - वसा घेणे.

534.  शंभर वर्षे भरणे - नाश होण्याची वेळ येणे.

535. शब्द जमिनीवर पडू देणे - दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

536.  शहानिशा करणे - एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

537.  शिगेला पोचणे - शेवटच्या टोकाला जाणे.

538.  श्रीगणेशा करणे - आरंभ करणे.

539.  संधान बांधने - जवळीक निर्माण करणे.

540.  संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे.

541.  संभ्रमित होणेगोंधळणे.

542.  सख्य नसणे - प्रेमळ नाते नसणे,मैत्री नसणे.

543.  सपाटा लावणे - एकसारखे वेगात काम करणे.

544.  समजूत काढणेसमजावणे.

545.  समरस होणे - गुंग होणे.

546.  सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

547.  सहभागी होणे - सामील होणे.

548. सही ठोकणे - निश्चित करणे.

549. सहीसलामत सुटणे - दोष येता सुटका होणे.

550. सांगड घालणे  - मेळ साधणे.

551. सांजावणे - संध्याकाळ होणे.

552. साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे.

553. साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे,खरेखुरे स्वरूप कळणे.

554. साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे.

555. साद घालणे - मनातल्या मनात दुःख करणे.

556. सामोरे जाणे - निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

557. सारसरंजाम असणे - सर्व साहित्य उपलब्ध असणे.

558. साशंक होणे - शंका येणे.

559. सुताने स्वर्गाला जाणे - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे.

560. सुळकांडी मारणे - सूर मारणे.

561. सूड घेणे - बदला घेणे.

562. सूतोवाच करणे - पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे.

563. सोटेशाई चालवणे - दांडगाई करणे.

564. सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.

565.  स्तंभित होणे - आश्चर्याने स्तब्ध होणे.

566. स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत येणे.

567.  स्वर्ग दोन बोटे उरणे आनंदाने,गर्वाने अतिशय फुगून जाणे.

568.  हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.

569.  हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट सोडणे.

570.  हमरीतुमरीवर येणे - जोराने भांडू लागणे.

571.  हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे.

572.  हवालदिल होणे - हताश होणे.

573. हशा पिकणे - हास्य स्फोट होणे.

574.  हसता हसता पुरेवाट होणे - अनावर हसू येणे.

575.  हसता हसता पोट दुखणे - खूप हसणे.

576. हस्तगत करणे - ताब्यात घेणे.

577.  हाडीमांसी भिनणे - अंगात मुरणे.

578.  हात ओला होणे - फायदा होणे.

579.  हात चोळणेचरफडणे.

580.  हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे.

581.  हात टेकणे - नाइलाज झाल्याने माघार घेणे.

582.  हात देणे - मदत करणे.

583.  हात धुऊन पाठीस लागणे - चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.

584. हात पसरणे - मागणे.

585. हात मारणे - ताव मारणे,भरपूर खाणे.

586. हात राखून जेवणे कमी जेवणे.

587. हात हलवत परत येणे - काम होता परत येणे.

588. हातघाईवर येणे भांडणाची वेळ येणे.

589. हातचा मळ असणे सहज शक्य असणे.

590. हातपाय गळणे - धीर सुटणे.

591. हातभार लावणे - सहकार्य करणे.

592. हाता पाया पडणे - गयावया करणे.

593. हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे.

594. हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत घेता फुकटचे श्रेय घेणे.

595. हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.

596. हातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा करणे.

597. हाय खाणे - धास्ती घेणे.

598. हिसका दाखविणे - बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे.

599. हुडहुडी भरणे - थंडी भरणे.

600. हुल देणे - चकवणे.

601. हेवा वाटणे मत्सर वाटणे.

602. हौस भागवणे - आवड पुरवून घेणे.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ  Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...