Friday, May 12, 2023

आलंकारिक शब्द Alankarik Shabd Marathi

 आलंकारिक शब्द Alankarik Shabd Marathi

 
alankarik-shabd-marathi
alankarik-shabd-marathi

1. अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस

2. अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न

3. अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस

4. अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य

5. अक्षरशत्रू – निरक्षर , अडाणी

6. अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे

7. अकलेचा कांदा – मूर्ख

8. उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा

9. ओनामा – सुरुवात ,प्रारंभ

10.  उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तू

11.  कर्णाचा अवतार – उदार मनुष्य

12.  कळसूत्री बाहुले – दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

13.  कळीचा नारद – कळ लावणारा

14.  कुंभकर्ण – अतिशय झोपाळू

15.  काडीपहिलवान – हडकुळा

16.  कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची बडबड

17.   कुपमंडूक – संकुचित वृत्तीचा

18.  खडाष्टक – जोरदार भांडण

19.  खडाजंगी – मोठे भांडण

20. खेटराची पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे

21.  खुशालचेंडू – चैनीखोर माणूस

22.  गंगा-यमुना – अश्रू 

23. गर्भश्रीमंत – जन्मापासून श्रीमंत

24. गाजरपारखी – कसलीही पारख नसलेला, मूर्ख

25. गंडांतर – भीतिदायक संकट

26. गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा

27.  गुरुकिल्ली – मर्म , रहस्य

28. घरकोंबडा – घराबाहेर न पडणारा

29. गोगलगाय – गरीब निरुपद्रवी मनुष्य

30.  चर्पटपंजरी – निरर्थक बडबड

31.  घोरपड – चिकाटी धरणारा

32. छत्तीसचा आकडा – शत्रुत्व

33. चौदावे रत्न – मार

34. टोळभैरव – कामात नासाडी करणारे लोक

35.  जमदग्नीचा अवतार – रागीट

36. त्रिशंकू – धड ना इकडे,धड ना तिकडे

37.  ताटाखालचे मांजर – दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा

38. दळुबाई – भेकड मनुष्य

39.  दगडावरची रेघ – कधीही न बदलणारे

40. धोपट मार्ग – सरळ , नेहमीचा मार्ग

41.  देवमाणूस – चांगला सज्जन माणूस

42. नंदीबैल – हो ला हो म्हणणारा

43. नवकोट नारायण – खूप श्रीमंत

44. पाताळयंत्री – कारस्थान करणारा

45. पर्वणी – अतिशय दुर्मिळ योग

46. पिकले पान – म्हातारा

47.  पांढरा कावळा – निसर्गात नसलेली वस्तू

48. पोपटपंची – अर्थ न कळता पाठांतर करणारा

49. बोकेसंन्यासी – ढोंगी मनुष्य

50. बिनभाड्याचे घर – तुरुंग

51.  बृहस्पती – बुद्धिमान

52.  बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने

53.  भाकडकथा – बाष्कळ गोष्टी

54. भगीरथ प्रयत्न – आटोकाट प्रयत्न

55.  मंथरा – दुष्ट स्त्री

56. भीष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा

57.  मारूतीचे शेपूट – लांबत जाणारे काम

58. मायेचा पूत – पराक्रमी मनुष्य , मायळू

59. मेषपात्र – बावळट

60. मृगजळ – केवळ आभास

61.  लंकेची पार्वती – अत्यंत गरीब स्त्री

62. रामबाण औषध – अचूक गुणकारी

63. वाटाण्याच्या अक्षता – नकार

64. लंबकर्ण – बेअकली

65.  वाहती गंगा – आलेली संधी

66. वामनमूर्ती – ठेंगू किंवा बुटका माणूस

67.  शेंदाड शिपाई – भित्रा

68. शकुनीमामा – कपटी मनुष्य

69. सव्यसाची – उलटसुलट कामकरणारा

70. सांबाचा अवतार – अत्यंत भोळा माणूस

71.   स्मशानवैराग्य – तत्कालिक वैराग्य

72.  सूर्यवंशी – उशिरा उठणारा

73.  सुळावरची पोळी – जीव धोक्यात घालणारे काम

74.  श्रीगणेशा – प्रारंभ

आलंकारिक  शब्दांची Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

100 simple two and three word sentences for 1st and 2nd-grade students

  Here's a list of 100 simple two- and three-word sentences for 1st and 2nd-grade students. Each sentence includes a Marathi translation...