Friday, May 12, 2023

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ.Marathi Ambiguous Words.

 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ.Marathi Ambiguous Words.

marathi-ambiguous-words
marathi-ambiguous-words

 

1.  अभंग – न भंगलेला ,काव्यरचनेचा एक प्रकार

2. अंतर – मन,भेद,लांबी

3. अनंत – अमर्याद , परमेश्वर

4. आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा

5. ऋण – कर्ज,उपकार,वाजबाकीचे चिन्ह

6. ओढा – मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ

7. अंक – मांडी,आकडा

8. अंग – शरीर,भाग ,बाजू

9. अंबर – आकाश,वस्त्र

10.  कळ – भांडणांचे कारण ,गुप्त किल्ली,वेदना

11.   कर – हात , किरण ,सरकारी सारा

12.  कर्ण – कान,महाभारतातील योद्धा ,त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू

13.  काळ – वेळ , यम ,मृत्यू

14.  गार - थंड ,बर्फाची गोटी

15.  घाट – डोंगरातील रस्ता , नदीच्या पायऱ्या

16.  चिरंजीव – मुलगा,दीर्घायुषी

17.   जलद – ढग ,लवकर

18.  जात - प्रकार,समाज

19.  जीवन – आयुष्य,पाणी

20.  जोडा - जोडपे,बूट

21.  डाव – कारस्थान ,कपट ,खेळी

22. तट – किनारा ,कडा,किल्ल्याची भिंत

23. तळी – तळाला,तलाव,ताम्हण

24. तीर – काठ ,बाण

25. दंड – शिक्षा , काठी ,बाहू

26. द्वविज – पक्षी ,ब्राह्मण

27.  धड – मानेखालचा शरीराचा भाग , अखंड,स्पष्टपणे

28. धडा - पाठ , रिवाज

29. ध्यान – चिंतन ,समाधी ,भोळसट व्यक्ती

30. धनी - मालक,श्रीमंत मनुष्य

31.  नाद – छंद ,आवाज

32. नाव – होडी ,काशाचेही नाव

33. पय – पाणी , दूध

34. पर – परका , पीस

35.  पक्ष – वादातील बाजू , पंख ,पंधरवडा,राजकीय संघटना

36. पत्र - पान ,चिठ्ठी

37.  पार – पलीकडे ,वडाच्या भोवतालचा पार

38. पास - उत्तीर्ण ,परवाना

39. पात्र – भांडे , नदीचे पात्र ,नाटकातील पात्र ,कारणीभूत ,योग्य

40. पूर – नगर ,पाण्याचा पूर

41.  भाव – भक्ती , किंमत ,दर , भावना

42. भेट – नजराणा ,भेटणे

43. माया – ममता ,धन,कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा

44. मान – मोठेपणा , शरीराचा एक भाग

45. माळ – फुलांची माळ,ओसाड जागा

46. वर – आशीर्वाद ,वरची दिशा ,ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष

47.  वल्ली – वेल , स्वच्छंद माणूस

48. वाणी – उद्गार ,व्यापारी ,एक सरपटणारा किडा

49. वार - दिवस ,घाव

50. वात – वारा , विकार ,दिव्याची वात

51.  वारी – पाणी ,यात्रा ,नियमित फेरी

52. वाली – रक्षण कर्ता ,एका वानराचे नाव

53.  विभूती – पुण्यपुरुष ,भस्म ,अंगारा , रक्षा

54. सुमन – फूल ,पवित्र मन

55.  सूत – धागा , सारथी

56. हार – पराभव ,फुलांचा हार

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे यांची Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...