Thursday, May 11, 2023

शब्दसमूहाबद्दल एक शब्द shabd samuha baddal ek shabd

शब्दसमूहाबद्दल एक शब्द shabd samuha baddal ek shabd

shabd-samuha-baddal-ek-shabd
shabd-samuha-baddal-ek-shabd

 

1.अंग राखून काम करणारा – अंगचोर

2.अकस्मात घडून आलेला बदल – क्रांती

3.अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी – आदिवासी

4.अतिशय उंच असलेला – अत्युच्च

5.अतिशय नाजुक – तोळामासा

6.अनुभव नसलेला – अननुभवी

7.अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी

8.अनेकांमधून निवडलेले – निवडक

9.अन्न देणारा -अन्नदाता

10.अपत्य नसणारा – निपुत्रिक

11.अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित

12.अरण्याचा राजा – वनराज

13.अरण्याची शोभा – वनश्री

14.अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी

15.आईवडील नसलेला – पोरका

16.आकाशात गमन करणारा – खग

17.आकाशातील ताऱ्यांचा पट्टा – आकाशगंगा

18.आग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र

19.आधुनिक विचारांचा दृष्टिकोण असणारा – पुरोगामी

20.आपल्या लहरी प्रमाणे वागणारा – स्वच्छंदी

21.आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा – खेळगडी

22.आवरता येणार नाही असे – अनावर

23.इच्छीलेली वस्तू देणारी गाय – कामधेनू

24.इतरांच्या आधारावर जगणारा – आश्रित

25.इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन – वतन

26.ईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक

27.ईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक

28.उंचावरुन कोसळणारा पाणलोट – धबधबा

29.उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा

30.उदयाला येत असलेला – उदयोन्मुख

31.एक देश सोडून दुसऱ्या देशी जाणे – देशांतर

32.एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे – एकेश्वरी

33.एकाच गोष्टीचा नाद करणारा – नादिष्ट

34.एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे – अन्योक्ती

35.एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिति – अभाव

36.ऐकण्यास गोड लागणारे – कर्णमधुर

37.ऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधिर

38.कथा लिहिणारा – कथाकार,कथालेखक

39.कथा सांगणारा – कथेकरी

40.कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य

41.कधीही नाश न पावणारा – अविनाशी

42.कधीही नाश न पावणारे – अविनाशी

43.कमी आयुष्य असलेला – अल्पायू,अल्पायुषी

44.कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी,क्षणभंगुर

45.कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष

46.कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराङमुख

47.कल्पना नसताना आलेले संकट – घाला

48.कविता करणारा / रचणारा – कवी

49.कविता करणारी – कवयित्री

50.कशाचीही भीती नसणारा – निर्भय

51.कष्ट करून जगणारा,श्रमांवर जगणारा – श्रमजीवी,कष्टकरी

52.कष्ट करून जगणारे – कष्टकरी

53.कसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ

54.कसलीही अपेक्षा नसणारा – निरपेक्ष

55.कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा – दिवटी

56.कार्य करण्यास सक्षम असलेला – कार्यक्षम

57.किल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट

58.कुंजात विहार करणारा – कुंजविहारी

59.कुस्ती खेळण्याची जागा – हौद,आखाडा

60.केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ

61.केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न

62.केवळ धर्मभेद करणारा – धर्मांध

63.कैदी ठेवण्याची जागा – कारागृह,बंदिशाळा,तुरुंग

64.कोणाचाही आधार नाही असा – अनाथ

65.कोणाच्याही पक्षात सामील न होणारा – अपक्ष

66.खूप आयुष्य असलेला – दीर्घायू,दीर्घायुषी

67.खूप दानधर्म करणारा – दानशूर

68.खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी

69.खूप मोठा विस्तार असलेले – ऐसपैस,विस्तीर्ण

70.गाईसाठी काढून ठेवलेला घास – गोग्रास

71.गाडीच्या चाकांनी पडलेली वाट – चाकोरी

72. गाणे गाणारा – गायक

73.गावच्या कामकाजाची जागा – चावडी

74.गावाचा कारभार – गावगाडा

75.गावाभोवतालचा तट – गावकूस

76.गुणांची कदर करणारा – गुणग्राहक

77.गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा – वावटळ

78.ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर – प्रक्षिप्त

79.घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित

80.घरदार नसलेला -उपऱ्या

81.घरी पाहुणा म्हणून आलेला – अतिथि

82.घोडे बांधायची जागा – पागा,तबेला

83.चंद्रापासून येणारा प्रकाश – चांदणे

84.चंद्राप्रमाणे मुख असणारी – चंद्रमुखी

85.चरित्र लिहिणारा – चरित्रकार

86.चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुद्धपक्ष,शुक्लपक्ष

87.चार पाय असणारे – चतुष्पाद

88.चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चव्हाट

89.चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक,चवाठा

90.चार वेदांमध्ये पारंगत असणारा – चतुर्वेदी

91.चारही बाजूला पाणी असलेला भूप्रदेश – बेट

92.चिखलात उगवलेले कमळ – पंकज

93.चित्रे काढणारा – चित्रकार

94.चिरकाल जगणारा – चिरंजीवी

95.जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाळ

96.जमिनीचे दान – भूदान

97.जमिनीतून पाझरून निघणारा झरा – उपळी

98.जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर

99.जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी – उभयचर

100.जमीनीखालचा गुप्त मार्ग – भुयार

101.जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा – दिपस्तंभ

102.जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार

103.जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी – कमलाक्षी

104.जिवंत असेपर्यन्त -आजन्म

105.जिवाला जीव देणारा – जिवलग

106.जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी

107.जे साध्य करावयाचे आहे ते – ध्येय

108.ज्याचा तळ लागत नाही असा – अथांग

109.ज्याचा थांग लागत नाही असा – अथांग

110.ज्याचा विवाह झाला नाही असा – अविवाहित

111.ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय

112.ज्याची किंमत होऊ शकत नाही असे – अनमोल

113.ज्याचे हात गुढघ्यापर्यन्त लांब आहेत असा – आजानुबाहू

114.ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि,चक्रधर

115.ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा – उपकृत

116.ज्याला आईवडील नाहीत असा – पोरका,अनाथ

117.ज्याला आकार नाही असा – निराकार

118.ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा – अजर

119.ज्याला कधीही वीट नाही असे – अवीट

120.ज्याला काशाचीच उपमा देता येणार नाही असे- अनुपम

121.ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू

122.ज्याला मरण नाही असा – अमर

123.ज्याला लाज नाही असा – निर्लज्ज

124.ज्याला सीमा नाही असे – असीम

125.ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा – अजिंक्य

126.ज्यास कोणीही शत्रू नाही असा – आजातशत्रू

127.ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक

128.ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे – नियतकालिक

129.डोंगर पोखरून तयार केलेला रस्ता – बोगदा

130.डोंगरकपारीत राहणारे लोक – गिरिजन

131.डोक्यावर ओझे वाहून नेणारा – माथाडी

132.ढगांनी भरलेले – ढगाळलेले,अभ्राच्छादित

133.तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख – ताम्रपट

134.तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा

135.तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय

136.तोंडावर स्तुती करण्याचा गुण – तोंडपुजेपणा

137.त्वरित कृती करणारा – जहाल

138.थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट

139.थोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट

140.थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा – आशीर्वाद

141.दगडावर कोरलेले लेख – शिलालेख

142.दगडावर मूर्ती घडवणारा – शिल्पकार

143.दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक

144.दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक

145.दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक

146.दर महिन्याला प्रसिद्ध होणारे – मासिक

147.दर वर्षाला,वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे – वार्षिक

148.दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक

149.दररोज ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम

150.दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक

151.दारावरील पहारेकरी – द्वारपाल,दारवान

152.दुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त

153.दुसऱ्याचे दु:ख पाहून कळवळणारा

154.दुसऱ्याच्या मनातील जाणणारा – मनकवडा

155.दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार,दिलदार

156.दुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी

157.दुसऱ्यावर अवलंबून नसलेला – स्वावलंबी

158.दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी

159.देव आहे असे मानणारा – आस्तिक

160.देवलोकातील सुंदर स्त्रिया – अप्सरा

161.देवापुढे सतत जळणारा दिवा -नंदादीप

162.देशाची सेवा करणारा – देशसेवक

163.दोन थड्या भरून वाहणारी नदी – दुथडी

164.दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण – संगम

165.दोन नद्यांमधील जागा – दुआब

166.धान्य साठवण्याची जागा – कोठार

167.न कळण्यासारखे – अनाकलनीय

168.न टाळता येणारे – अपरिहार्य

169.नऊ दिवस टिकणारा ताप – नवज्वर

170.नदीची सुरुवात होते ती जागा – उगम

171.नदीतील खोलगट भागातील खोल पाणी – डोह

172.नवऱ्या मुलाचा बाप – वरबाप

173.नवीन मतांचा पुरस्कार करणारा  - नवमतवादी

174.नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – आभास

175.नाटक लिहिणारा – नाटककार

176.नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत – नांदी

177.नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट,अभिनेता

178.नाणी तयार करण्याचा कारखाना – टंकसाळ

179.नावाचा एकसारखा उच्चार – घोष

180.निरर्थक गोष्टी किंवा गप्पा – भाकडकथा

181.निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था – अनाथाश्रम

182.नेत्याचे अनुकरण करणारे – अनुयायी

183.नेहमी खोडी काढणारा – खट्टयाळ

184.नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा

185.पडक्या घराची मोकळी जागा – बखळ

186.पडदा दूर करणे – अनावरण

187.पतीचा भाऊ – दीर

188.पहाटेपूर्वीची वेळ – उष:काल

189.पाऊस मुळीच न पडणे -अवर्षण , अनावृष्टी

190.पाच वडांचा समूदाय असलेली जागा – पंचवटी

191.पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी

192.पाण्यात राहणारे प्राणी – जलचर

193.पायात जोडे न घातलेला – अनवाणी

194.पायात पादत्राणे न घालता – अनवाणी

195.पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक

196.पायी जाणारा – पादचारी

197.पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा – प्रदर्शन

198.पाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक

199.पिकांच्या दोन ओळींतील अंतर – पाथगी

200.पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ – पेय

201.पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक – पूरग्रस्त

202.पूर्वी कधीही घडले नाही असे – अभूतपूर्व

203.पूर्वी कधीही न ऐकलेले – अश्रुतपूर्व

204.पूर्वी कधीही न घडलेले – अभूतपूर्व

205.पूर्वी जन्मलेला – पूर्वज

206.प्रेरणा देणारा – प्रेरक

207.फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त,अन्नछत्र

208.बसगाड्या थांबण्याची जागा – बस-स्थानक

209.बातमी आणून देणारा/देणारी – वार्ताहर

210.बातमी सांगणारा/सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका

211.बालकांपासून वृद्धांपर्यन्त सर्वजण – आबालवृद्ध

212.बिनचूक वजनाचा काटा – धारवाडी काटा

213.भांडण उकरून काढणारा – भांडकुदळ

214.भाकरी करण्याची लाकडी परात – काठवत

215.भाषण ऐकणारे – श्रोते

216. भाषण करणारा – वक्ता

217. मडकी बनवणारा -कुंभार

218. मन/चित्त आकर्षित करणारा – मनोहर,चित्ताकर्षक,मनोवेधक चित्तवेधक

219.मनाला आल्हाद देणारा – आल्हाददायक

220.मरण येईपर्यंत – आमरण

221.मशाल धरणारा नोकर – मशालजी

222.माकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी

223.मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक – चित्रगुप्त

224.मालाचा साठा करून ठेवण्याची जागा – गुदाम,कोठार,वखार

225.मासे पकडणारा – कोळी

226.मुद्द्याला धरून असलेले – मुद्देसूद

227. मूर्ती बनवणारा – मूर्तिकार

228. मूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक

229.मूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक

230.मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय

231.मोजता येणार नाही असे – अगणित,असंख्य

232.मोठ्याने केलेले पाठांतर – घोकंपट्टी

233.मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र

234.म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार – म्हातारचळ

235.यज्ञ करण्याची ठराविक जागा – यज्ञसूकर

236.योजना आखणारा – योजक

237. रक्षण करणारा – रक्षक

238.रणांगणावर आलेले मरण – वीरमरण

239.राजाची स्तुती करणारा – भाट

240.राज्यातील लोक – प्रजाजन,रयत,प्रजा

241. रात्री फिरणारा – निशाचर

242. रात्रीचा पहारेकरी – जागल्या

243.रिकामा हिंडणारा – टवाळखोर

244.रोग्याची शुश्रूषा करणारी – परिचारिका

245.लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर – माहेर

246.लग्नात द्यावयाची भेट – आहेर

247.लग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी

248.लढण्याची विद्या – युद्धकला

249.लहान मुलाला झोपण्यासाठी गायिलेले गाणे – अंगाईगीत

250.लाखो रुपयाचा धनी – लक्षाधीश

251.लिहिता – वाचता येणारा – साक्षर

252.लिहिता वाचता न येणारा – निरक्षर

253.लोकांचा आवडता – लोकप्रिय

254.लोकांचे नेतृत्व करणारा – लोकनायक

255.लोकांचे पुढारीपण करणारा – पुढारी

256.लोकांच्या मदतीने चाललेले राज्य – प्रजासत्ताक

257.लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य

258.वनात राहणारे प्राणी – वनचर

259.वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय

260.वाडवडिलांकडून मिळालेली – वाडीलोपार्जित

261.वारस नसलेला – बेवरसी

262.विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई

263.विमान चालवणारा – वैमानिक

264.विविध बाबींत प्रवीण असलेला – अष्टपैलू

265.विषयाला सोडून बोलणे – अप्रस्तुत

266.व्याख्यान देणारा – व्याख्याता

267.शत्रूकडील बातमी काढणारा – हेर

268.शत्रूला सामील झालेला – फितूर

269.शापापासून सुटका – उ:शाप

270.शिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण

271.शिल्लक राहिलेले – उर्वरित

272.शेती करतो तो – शेतकरी

273.शोध लावणारा – संशोधक

274.श्रम न करता खाणारा -ऐतोबा

275.श्रेष्ठ ऋषि – महर्षी

276.संकट दूर करणारा – विघ्नहर्ता

277.संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक

278.सतत उद्योगशील असणारा – उद्यमशील

279.सतत एकटे राहण्याची आवड असलेला – एकलकोंडा

280.सतत काम करणारा – दिर्घोद्योगी

281.सतत कोसळणारा पाऊस – झड

282.सतत निंदानालस्ती करणारा – निंदक

283.सतत पैसा खर्च करणारा – उधळ्या

284.समाजाची सेवा करणारा – समाजसेवक

285.सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष

286.सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू

287.सर्व दिशांना पांगलेले – दिगंतर

288.सर्वात शेवटी जन्मलेला -अनुज

289.साक्षात्कार झालेला – द्रष्टा

290.सापांचा खेळ करणारा – गारुडी

291.सिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथा लेखक

292.सुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप

293.सूचना न देता येणारा – अतिथि

294.सूर्याचे उत्तरेकडे सरकणे – उत्तरायण

295.सैन्याची चक्राकार केलेली रचना – चक्रव्यूह

296.स्तुती गाणारा – भाट

297.स्वच्छ,गार पाणी ठेवण्याची जागा – आबदारखना

298.स्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ

299.स्वतः संपादन केलेली – स्वार्जित,स्वसंपादित

300.स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र – आत्मवृत

301.स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा – सांगकाम्या

302.स्वतःच्या फायद्याचे पाहणारा – अप्पलपोटा

303.स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा – स्वार्थी

304.स्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी

305.स्वतःबद्दल अभिमान नसलेला – स्वाभिमानशून्य

306.स्वदेशाचा अभिमान असणारा – स्वदेशाभिमानी

307.स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन

308.हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत

309.हत्तीला वश करण्याचे साधन – अंकुश

310.हरिणासारखे डोळे असणारी – मृगाक्षी,हरिणाक्षी,मृगनयना

311.हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्रांती

312.हिंडून करायचा पहारा – गस्त

313.हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल

314.होडी चालवणारा – नावाडी,नाखवा,नाविक

शब्दसमूहाबद्दल एक शब्दांची Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

100 simple two and three word sentences for 1st and 2nd-grade students

  Here's a list of 100 simple two- and three-word sentences for 1st and 2nd-grade students. Each sentence includes a Marathi translation...