Wednesday, May 10, 2023

Marathi Vakprachar वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग (भाग 2)

 Marathi Vakprachar वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग (भाग 2)

          (भाग 1 साठी येथे क्लिक करा.

marathi-vakprachar
marathi-vakprachar

 

151. चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच सर्व वर्ग चिडीचूप झाला.

152. चेव चढणे :- मांजराला पाहताच कुत्र्याला चेव चढला.

153. छाया शोधणे :- भर उन्हात शेतात चालता चालता सतीश दमला छाया शोधू लागला.

154. जाहीर करणे :- उद्या शाळेत परीक्षा असल्याचे मुख्याध्यापकांनी जाहीर केले.

155. जिवाचे सोने होणे :- चारही मुले शिकून चांगल्या पदावर नोकरी करत असल्यामुळे सखारामच्या जिवाचे सोने झाले.

156. जीवदान देणे :- सिंहाने उंदराला जीवदान दिले.

157. जीवावर येणे :- उंच डोंगर चढणे रमाच्या जीवावर आले.

158. जीव मेटाकुटीला येणे :- शेतात सतत होणाऱ्या हरणाच्या त्रासामुळे सदुचा जीव मेटाकुटीला आला.

159. जीव सुखावणे :- मुलाने परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून दिनूच्या वडिलांचा जीव सुखावला.

160. झडप घेणे :- घारीने सापावर आकाशातून झडप घातली.

161. डोळा चुकवणे :- लहानसा गोपाळ आईचा डोळा चुकवून खेळायला गेला.

162. डोळे भरून येणे :- परदेशात चाललेल्या राजुला पाहून त्याच्या वडीलाचे  डोळे भरून आले.

163. डोळे ओले होणे :- अनेक वर्षापासून आपला हरवलेला मुलगा सापडल्यानंतर आई मुलाच्या भेटीचा प्रसंग पाहताना अनेकांचे डोळे ओले झाले.

164. डोळे पाण्याने डबडबणे :- सासरी निघालेल्या मुलीला निरोप देताना आईचे  डोळे पाण्याने डबडबले.

165. डोळ्यांत पाणी येणे :- ताईला सासरी धाडताना आईच्या डोळ्यांत पाणी आले.

166. डोळ्यांतून टिपे गळणे :- दहा वर्षांनी आईने आपल्या मुलाला पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली.

167. डोळे दिपणे :- अजिंठ्याच्या लेण्या पाहून रमाचे डोळे दिपले.

168. डोक्यावर घेणे. अर्थ :- अतिलाड करणे.वाक्य :- शंकरचा चित्रकलेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आला, तेव्हा बाबांनी त्याला डोक्यावर घेतले.

169. तणतणणे :- राधाला आईने मैत्रिणिकडे जाऊ दिले नाही; म्हणून ती आईवर तणतणली.

170. तडे पडणे :- पाऊस पडल्यामुळे जमिनीला तडे पडतात.

171. तहानभूक हरपणे :- सायकल पहिली की,राजूची तहानभूक हरपते.

172. तर्क करणे :- रमेश मुंबईला गेल्याचे समजताच,तो आपल्या मामाकडे गेला असणार असा आईने तर्क केला.

173. तडाखा बसणे :- मागील वर्षी नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला.

174. ताजेतवाने होणे :- सकाळच्या मोकळ्या हवेत फिरल्याने मी ताजातवाना झालो.

175. ताण येणे :- उद्याच्या इंग्रजीच्या पेपरचा रामच्या मनावर ताण आला.

176. तावडीतून सुटणे :- अखेरीस हरिण वाघाच्या तावडीतून सुटले.

177. ताब्यात देणे :- चोराला पकडल्यानंतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

178. तीरासारखे धावणे. अर्थ:- खूप वेगाने धावणे. वाक्य :- राम धावण्याच्या स्पर्धेत तीरासारखा धावतो.

179. तांबडे फुटणे :- तांबडे फुटले की आई घरकामाला लागते.

180. तोंडचे पाणी पळणे :- भला मोठा साप दोन पावलांवर पाहताच संतोषच्या तोंडचे पाणी पळाले.

181. तोंडघशी पडणे :- उडी मारताना तोल जाऊन राम तोंडघशी पडला.

182. तोंडातून चकार शब्द काढणे :- चुकीबद्दल वडील रामवर ओरडले तेव्हा रामच्या तोंडातून चकार शब्द बाहेर पडला नाही.

183. तुडुंब भरणे :- पावसाळ्यात गावातील सर्व विहिरी तुडुंब भरतात.

184. त्रेधा-तिरपीट उडणे :- दुपारी येणारे पाहुणे सकाळीच घरी आल्यामुळे आईची त्रेधा-तिरपीट उडाली.

185. त्याग करणे :- गांधीजींच्या आदेशानुसार सर्व देशवासीयांनी विदेशी कपड्यांचा त्याग केला.

186. थक्क करणे :- नाटकातील आपली साधूची जोरदार भूमिका वठवत विशालने सर्वांनाच थक्क केले.

187. थट्टा करणे : सर्व दोस्तांमध्ये रमेश हडकुळा असल्यामुळे सगळे त्याची थट्टा करत.

188. थाप मारणे :- सिनेमा बघायला गेलेल्या रामने 'मी शाळेत गेलो होतो,' अशी बाबांना थाप मारली.

189. दगा देणे :- चांगल्या मित्राला कधीही दगा देऊ नये.

190. दर्शन घेणे :- शेगावला जाऊन आम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेतले.

191. दाद मागणे :- आपल्यावर झालेल्या अन्यायाची आपल्याला कोर्टात दाद मागता येते.

192. दिवस रेटणे :- काही कामगार कारखान्यात काम करता फक्त दिवस रेटत होते.

193. दिलासा देणे :- महापुरामुळे घरे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला.

194. दुजोरा देणे :- शाळेची सहल काढायची, या गुरुजींच्या म्हणण्याला वर्गातील सर्व मुलांनी दुजोरा दिला.

195. देखरेख करणे :- राम सावकारांच्या शेताची देखरेख करतो.

196. देवाणघेवाण करणे :- चांगल्या विचारांची आपण सर्वांनी देवाणघेवाण केली पाहिजे.

197. देह झिजवणे :- शाहिद भागतसिंगांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला.

198. देहभान हरपणे :- खेळताना लहान मुले देहभान हरपतात.

199. धड समजणे :- छोटा रमण काय बोलत होता ते आम्हा मुलांना धड समजत नव्हते.

200. धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना पकडून गजाआड करून  चांगलाच धडा शिकवला.

201. धडे देणे : शाळेत मुलांना नम्रतेने वागण्याचे धडे दिले जातात.

202. धपाटे घालणे :- आपला गृहपाठ पूर्ण करणाऱ्या मुलांच्या पाठीत सर धपाटे घालायचे.

203. ध्यास घेणे : सतिषने भविष्यात क्रिकेटर होण्याचा ध्यास घेतला.

204. धाडस दाखवणे :- रामुने एकट्याने अंधाऱ्या खोलीत प्रवेश करण्याचे धाडस दाखवले.

205. धाप लागणे :- उंच डोंगर चढल्यामुळे निताला धाप लागली.

206. धूम धावत सुटणे :- मांजराला पाहताच उंदीर धूम धावत सुटले.

207. नक्कल करणे :- स्नेहसंमेलनात दिनेशने हुबेहूक अनेक कलाकारांच्या आवाजाची नक्कल केली.

208. नजर ठेवणे :- बसस्थानकावर पोलिसांनी पाकीट मारणाऱ्यांवर नजर ठेवली होती.

209. नवल वाटणे :- छोट्याशा रवीने स्वतः सायकल तयार केलेली पाहून त्याच्या आईला नवल वाटले.

210. नजर चुकवणे :- पिंकीने आईची नजर चुकवून डब्यातील लाडू काढले.

211. नाव गाजने :-भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकून जगात भारताचे नाव गाजवले.

212. नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे.वाक्य :- दहावीच्या वार्षिक परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून दिनेशने नाव मिळविले.

213. निरीक्षण करणे :- पोलिसांनी अपघात झालेल्या जागेचे निरीक्षण केले.

214. निष्ठा असणे :-राधाची आपल्या वर्गशिक्षिकेवर खूप निष्ठा होती.

215. निपचित पडून राहणे :- आजारी असलेला वाघ प्राणीसंग्रहालयात निपचित पडून होता.

216. पर्वा नसणे :- पाण्यात बुडणाऱ्या सागरला वाचवताना गणेशने आपल्या जीवाची पर्वा केली नाही.

217. पश्चात्ताप होणे :- ज्या सतिशला आपण नेहमी तुच्छ समजून हसत होतो त्यानेच आपल्याला संकट काळात मदत केली याचा गणेशला पश्चाताप  झाला.

218. पाया पडणे :- सर्वानी रोज संध्याकाळी हातपाय धुऊन देवाच्या पाया पाडाव्यात.

219. पाय ओढणे :- पुढे जाणाऱ्या व्यक्तीचे कुणीही पाय ओढू नयेत.

220. पायाशी बसणे :- आम्ही गावी गेलो की, आमच्या आजोबांच्या पायाशी बसतो.

221. पार पडणे :- शेवटी राधाच्या लग्नाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

222. पोट भरणे :-सदू  दिवसरात्र आपल्या बैलगाडीवर कष्ट करून आपले पोट भरतो.

223. पोटाला चिमटा घेणे :-पोटाला चिमटा घेऊन सदाशिवने आपल्या नंदुला  उच्च शिक्षण दिले.

224. पोशिंदा असणे :- शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे.

225. प्रत्युत्तर देणे :- सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला राजू प्रत्युत्तर देत होता.

226. प्रसंग बेतणे :-पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचा प्रसंग बेतला.

227. प्रविष्ट होणे :- काही लोक आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रविष्ट होतात.

228. प्राणाचे बलिदान करणे :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले.

229. पाय धरणे :- हातून घडलेल्या चुकीबद्दल तुकारामने सावकारांचे पाय धरले.

230. प्रेमाचा भुकेला असणे :- लहान मुले प्रेमाची भुकेली असतात.

231. फावला वेळ मिळणे :-फावल्या वेळात रमेश वर्तमानपत्र वाटून आपला शाळेचा खर्च भागवतो.

232. फिर्याद करणे :-जमिनीच्या वादावरून सखारामने आपल्या शेजाऱ्याविरुद्ध  फिर्याद केली.

233. बहुमान मिळणे :-क्रिकेटच्या सामन्यात १०० धावा पूर्ण केल्यामुळे सचिनला मॅन ऑफ मॅचचा बहुमान मिळाला.

234. बडगा दाखवणे :- चोरांनी गुन्हा कबूल करावा म्हणून पोलिसांनी त्यांना कडक शिक्षेचा बडगा दाखवला.

235. बाजूस सारणे :- राधाने टेबलावरचे दप्तर बाजूला सारले.

236. बारा महिने तेरा काळ :- तुकारामची देवपूजा अगदी बारा महिने तेरा काळ सुरूच असते.

237. बाजार भरणे :- सुट्ट्यामध्ये गावात खेळण्यासाठी मुलांचा बाजार भरतो.

238. बालेकिल्ला असणे :- मुंबई शहर हे उमेदवार देशमुखांचा बालेकिल्ला होता.

239. बावचळणे :- अचानक समोरून आलेल्या हत्तीला पाहून रमेश बावचळला.

240. बुचकळ्यात पडणे :- अर्थ:- गोंधळून जाणे. झोपेतून उठलेल्या बाळाला आपण नवीन घरी आहोत हे समजताच ते बुचकाळ्यात पडले.

241. बेभान होणे :- आपल्या मित्राच्या लग्नात सदाशिव बेभान होऊन नाचला.

242. भाळी असणे :- दिवसभर मोलमजूरी करून पोट भरणे हेच आमच्या कुटुंबाच्या भाळी होते.

243. भांबावून जाणे :- दिवाळीच्या दिवशी अचानक मोठमोठ्या फटाक्यांचा आवाज ऐकून रवी भांबावून गेला.

244. भांबावून जाणे. अर्थ :- गोंधळून जाणे. वाक्य :- गावातील माणसे जेव्हा पहिल्यांदा शहरात येतात, तेव्हा शहरातील गर्दी पाहून ते भांबावून जातात.

245. भीतीने थरथरणे :-गणेशचे गणित चुकल्यामुळे सर त्याच्यावर रागावले, परंतु शाळा सुटल्यावरही तो भीतीने थरथरत होता.

246. भुकेने तडफडणे :-आजारी असलेला सिंह चार दिवसापासून उपाशी असल्यामुळे भुकेने तडफडत होता.

247. भुलून जाणे :- पेंटरने काढलेले ते सुंदर चित्र पाहून सर्व मुले भुलून गेली.

248. भेदरणे :- अपघातात खूप मार लागल्यामुळे सदू खूप भेदरला होता.

249. मन रमणे :- शंकरचे मन फक्त अभ्यासात रमते.

250. मर्जी राखणे. अर्थ :- खूश ठेवणे.वाक्य:-काही राजकीय नेते निवडणूक जवळ आल्यावर जनतेची मर्जी राखायला सुरू करतात.

251. मनाई असणे :-काही ठिकाणी वाहनांना थांबण्यास मनाई असते.

252. मशागत करणे :- शेतात चांगले पीक यावे यासाठी शेतकरी वर्षभर शेतात मशागत करतात.

253. मस्तक आदराने लवणे :- आजही आमच्या शाळेतील शिक्षक दिसले की,आमचे मस्तक आदराने लवते.

254. माघार घेणे :- आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी कोंबडीने रौद्ररूप धारण केलेले पाहून सापाने माघार घेतली.

255. मान डोलवणे:- वर्गातील काही मुले सरांनी शिकवलेला भाग समजला नाही तरी मान डोलवतात.

256. मातीजमा होणे :- बर्ड फ्लू मुळे अनेक पक्षी मातीजमा झाले.

257. मान खाली घालणे :- खोडी करणाऱ्या रामला सरांनी उभे करून जाब विचारला तेव्हा रामने मान खाली घातली.

258. मान देणे :- आमच्या गावातील सारपंचांना लोक खूप मान देतात.

259. मान हलवणे :- सरांनी शाळेची सहल काढायची का ? असे विचारताच सर्वांनी मान हलवली.

260. मुक्त करणे :- झाडाच्या फांदीत शिंगे अडकलेल्या काळविटाला वन अधिकाऱ्यांनी  मुक्त केले.

261. मृत्यू पावणे :- साप चावल्याने कुत्र्याचे पिल्लू मृत्यू पावले.

262. मोह होणे :- सुनीलची नवीन पेन्सिल पाहून अनिलला ती चोरण्याचा मोह झाला.

263. मौन पाळणे :- गुंडांनी भर दिवसा गावातील एका माणसाला मारले तरी गावातील सर्व लोकांनी तोंडातून ब्र काढता मौन पाळले होते.

264. याचना करणे :- चोराने पोलिसांकडे आपल्याला सोडण्यासाठी याचना केली.

265. येरझारा घालणे :- रात्री उशिरापर्यंत गणेश घरी परतला नाही, म्हणून त्याची आई अंगणातच येरझारा घालत होती.

266. रक्त उसळणे :- शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैनिकांचे रक्त उसळले.

267. रक्ताचे पाणी करणे. अर्थ :- खूप कष्ट करणे.वाक्य:- राजुला खूप शिकवण्यासाठी त्याच्या वडिलांनी रक्ताचे पाणी केले.

268. रद्द करणे :- कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे या वर्षी परीक्षा रद्द केली गेली.

269. रमून जाणे :- नवीन ठिकाणी गेल्यावरही गणेश लगेच रमून जातो.

270. रवंथ करणे :- शेतातून घरी आल्यावर गाईगुरे रवंथ करत बसतात.

271. रात्रीचा दिवस करणे. अर्थ :- खूप कष्ट करणे.वाक्य:-शंकरने रात्रीचा दिवस करून परीक्षेत चांगले यश मिळवले.

272. रंगात येणे :- दुपारी मुलांचा गोटयांचा डाव रंगात आला होता.

273. राग येणे :- सदूने आपला शर्ट फाडला म्हणून रामला त्याचा खूप राग आला.

274. राजी असणे :- पोहायला जायचे म्हणताच सर्व मुले लगेच राजी झाली.

275. राब राब राबणे :- सदाशिवचे वडील शेतात दिवसभर राब राब राबतात.

276. रुसून बसणे :- दीपाने आपले खेळणे तोडले म्हणून छोटा गणू रुसून बसला.

277. लगबग असणे :- घरी पाहुणे येणार असल्याने दिनेशच्या घरात दिवसभर लगबग होती.

278. लुप्त होणे :- आकाशात दाटून आलेल्या ढगांमुळे सूर्य लुप्त झाला.

279. लौकिक मिळवणे :- सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळून जगात लौकिक मिळवला.

280. वचन देणे :- यापुढे मी कधीही वाईट काम करणार नाही , असे सूरजने आईला वचन दिले.

281. वर्गवारी करणे :- कब्बड्डीच्या खेळासाठी  सरांनी वयोगटाप्रमाणे मुलांची वर्गवारी केली.

282. वाटेकडे कान लावून बसणे :- बाबा आज बाजारातून आपल्यासाठी नवीन पुस्तके आणणार म्हणून मुळे वाटेकडे कान लावून बसली होती.

283. वाईट वाटणे :- राजुचा अपघात झाला हे ऐकून रमेशला खूप वाईट वाटले.

284. विचारपूस करणे :-आमचे सर वर्गात नेहमी कोणताही घटक समजला का नाही याची विचारपूस करतात.

285. विचारविनिमय करणे :- राजूला बारावीनंतर कोठे शिकण्यास पाठवायचे याबद्दल त्याच्या आईवडिलांनी विचारविनिमय केला.

286. विसर पडणे :- आमच्या मित्रांचे कितीही भांडण झाले तरी आम्हांला त्याचा विसर पडतो.

287. विळखा घालणे :- सापाने कुत्र्याच्या पिल्लाला विळखा घातला.

288. विश्रांती घेणे :- तुकाराम शेतात काम केल्यानंतर दुपारी विश्रांती घेतो.

289. वेष पालटून फिरणे :- पूर्वीचे राजे लोकांचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी आपल्या राज्यातून वेष पालटून फिरायचे.

290. शब्द देणे :- आपण यापुढे कधीही खोडी करणार नाही असा रामने आईला शब्द दिला.

291. शब्द मोडणे :- पुन्हा खोटे बोलणार नाही, असे सांगूनही रामेशने आज गुरुजींना दिलेला शब्द मोडला.

292. शरमिंदा होणे :- सवकारांकडे पुन्हा पैसे मागताना सदू शरमिंदा झाला.

293. शान वाढवणे :- बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिला येवून गणेशने आपल्या शाळेची शान वाढवली.

294. शिकवण देणे :- संतांनी लोकांना चांगली शिकवण दिली.

295. शिगेला पोहोचणे :- रंगात आलेला क्रिकेटचा सामना पाहताना उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली.

296. शीण येणे :- दिवसभर शेतात काम करून सखारामला शीण आला.

297. सक्रिय सहभाग घेणे :- गावातील सप्त्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी गावातील लोकांनी सक्रिय सहभाग घेतला.

298. सढळ हाताने मदत करणे :- मंदिराचे बांधकाम करण्यासाठी लोकांनी सढळ हातानी मदत केली.

299. सन्मान करणे :- दहावीच्या परीक्षेत राजू पहिला आल्याने मुख्याध्यापकांनी त्याचा सन्मान केला.

300. सल्ला देणे :- आमच्या सरांनी मला नवोदयच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला.

          (भाग 1 साठी येथे क्लिक करा. )

यांसारख्या महत्त्वपूर्ण pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.   

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

"English Speaking Practice":

 1. क्या तुम तैयार हो? Are you ready?  2. तुम क्या कर रहे हो? What are you doing? 3. क्या तुमने खाना खा लिया? Did you eat your meal? 4. क्या...