Monday, May 15, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 6

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 6

     (भाग 5)               (भाग 7) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

501. Oh, I got it. अच्छा, समजलं.

502. Tell us more. आम्हाला अजून सांगा.

503. Are you alone? तू एकटा आहेस का? तू एकटी आहेस का ?

504. I am sneezing. मी शिंकत आहे.मी शिंकतोय.मी शिंकतेय.

505. He talks well. तो चांगला बोलतो.तो बर्‍यापैकी बोलतो.

506. I read a book. मी एक पुस्तक वाचलं.मी पुस्तक वाचले.

507. Who wrote it? कोणी लिहिलं ? हे कोणी लिहिले ?

508. You will eat. तू खाशील.

509. You're lying! तू खोटं बोलतोयस! तुम्ही खोटं बोलत आहात! आपण खोटे बोलत आहात!

510. Who resigned? कोणी राजीनामा दिला? राजीनामा कोणी दिला?

511. He liked that. त्याला ते आवडलं.त्याला ते आवडले.

512. God knows why. का ते देव जाणे.

513. Who'll fight? कोण लढेल ?

514. How beautiful ! किती सुंदर !

515. Cook the rice. भात शिजव. भात शिजवा.

516. You're small. तू छोटा आहेस. तू छोटी आहेस. तुम्ही छोटे आहात.

517. I need a loan. मला कर्जाची गरज आहे.मला कर्ज हवे आहे.

518. Hurry up, Dinesh. लवकर कर, दिनेश.

519. Anything else ? अजून काही ?

520. I lied to Suresh. मी सुरेशशी खोटं बोललो. मी सुरेशशी खोटं बोलले.

521. Can Geeta do it? गीता करू शकेल का?

522. Come back, OK? परत ये, बरं का? परत या, बरं का?

523. Who sent Rajesh? राजेशला कोणी पाठवलं?

524. He dug a hole. त्याने एक खड्डा खोदला.

525. Who's crying? कोण रडतंय? कोण रडत आहे ?

526. Are they dead? ते मेले आहेत का?

527. I made dinner. मी जेवण बनवलं. मी रात्रीचं जेवण बनवलं.

528. Come tomorrow. उद्या ये. उद्या या.

529. I did nothing. मी काही केलं नाही.मी काही केले नाही.

530. Do that later. ते नंतर कर. ते नंतर करा.

531. Are you tired?  तू थकलास का? तू थकलीस का? तुम्ही थकलात का?

532. Does Gauri know? गौरीला माहीत आहे का?

533. Don't do this. हे करू नका. असं करू नका.

534. Dance with me. माझ्याबरोबर नाच. माझ्याबरोबर नाचा.

535. Who's coming? कोण येत आहे?

536. I looked away. मी लक्ष्य वळवलं.

537. I didn't call. मी फोन केला नाही.

538. Don't open it. ते उघडू नकोस. ते उघडू नका.

539. He's very ill. तो खूप आजारी आहे.

540. Eat and drink. खा आणि पी.खा आणि प्या.

541.  Don't call me. मला फोन करू नको.मला फोन करू नका.

542.  I have a cold. मला सर्दी झाली आहे.

543.  Eat something. काहीतरी खा. काहीतरी खाऊन घे.

544.  Do it quickly. लवकर कर. लवकर करा.

545.  Flowers bloom. फुले फुलतात.

546.  Who sent you? तुला कोणी पाठवलं? तुम्हाला कोणी पाठवलं?

547.  Give me a day. मला एक दिवस द्या. मला एक दिवस दे.

548. Bring it home. ते घरी आण.

549. Who's hungry? कोणाला भूक लागली?

550. Who told Sagar? सागरला कोणी सांगितलं?

551. Give me those. ते मला दे. ते मला द्या.

552. Get undressed. कपडे काढ. कपडे काढा.

553. Have some tea. थोडासा चहा घ्या.

554. He went blind. तो आंधळा झाला.

555. Give it to me! मला दे! मला द्या!

556. He got caught. तो पकडला गेला.

557.  Give him time. त्याला वेळ दे. त्याला वेळ द्या.

558.  Don't come in. आत येऊ नको. आत येऊ नका.

559.  He has a book. त्याच्याकडे एक पुस्तक आहे.

560.  I dye my hair. मी माझे केस रंगवतो. मी माझे केस रंगवते.

561.  He is my boss. तो माझा बॉस आहे.

562. He is reading. तो वाचत आहे.

563. Who told you? तुला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं?

564. Will this do? हे चालेल का? असं चालेल का?

565. He knows lots. त्याला बरेच काही माहीत आहे.

566. He is a thief. तो चोर आहे. तो एक चोर आहे.

567.  Call me later. मला नंतर बोलव! मला नंतर फोन कर!

568. He's studying. तो अभ्यास करतोय.

569. He's your son. तो तुझा मुलगा आहे.तो तुमचा मुलगा आहे.

570. Who was here? इथे कोण होतं? इथे कोण होता?

571. You are good. तू चांगला आहेस. तू चांगली आहेस. तुम्ही चांगले आहात.

572. His nose bled. त्याच्या नाकातून रक्त आलं.

573. He lied to me. तो माझ्याशी खोटं बोलला.

574. How can it be? हे कसे असू शकते? असं कसं असू शकतं? कसं असू शकतं?

575.  I have a ring. माझ्याकडे आंगठी आहे.

576.  I became rich. मी श्रीमंत झालो. मी श्रीमंत झाले.

577.   He tricked me. त्याने मला फसवलं.त्याने मला फसवले. 

578.  I can't dance. मला नाचता येत नाही.मी नाचू शकत नाही.

579.  I cried a lot. मी खूप रडलो. मी खूप रडले.

580. Who was that? तो कोण होता? कोण होता तो ?

581.  You are late. तुला उशीर झाला.

582.  I cried again. मी पुन्हा रडलो. मी पुन्हा रडले.

583.  He's innocent. तो निर्दोष आहे.

584.  He is at home. तो घरी आहे.

585.  Blow the horn. हॉर्न वाजव. हॉर्न वाजवा.

586.  I didn't know. मला माहीत नव्हतं.

587.  I ignored Sarika. मी सारिकाकडे दुर्लक्ष केलं.

588. I didn't stop. मी थांबलो नाही. मी थांबले नाही.

589. I always walk. मी नेहमीच चालतो.

590. I don't dream. मला स्वप्नं पडत नाहीत.मी स्वप्न पाहत नाही.

591.  I fear no one. मी कोणालाही भीत नाही.मला कुणाचीही भीती वाटत नाही.

592.  Who will win? कोण जिंकेल?

593.  You are rich. तू श्रीमंत आहेस. तुम्ही श्रीमंत आहात.

594.  I found a job. मला एक नोकरी मिळाली.

595.  I denied that. मी ते नाकारलं.मी ते नाकारले.

596. Who ran away? कोण पळून गेलं? कोण पळाला?

597.  I lied to you. मी तुझ्याशी खोटं बोललो. मी तुझ्याशी खोटं बोलले.मी तुम्हाला खोटे बोललो.

598.  You can't go. तू जाऊ शकत नाहीस.

599.  Am I dreaming? मी स्वप्न बघतोय का? मी स्वप्न बघतेय का?

600. Don't tell me. मला सांगू नका. मला सांगू नकोस.

       (भाग 5)                (भाग 7)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

5 comments:

  1. Very nice Useful Post For All Students.

    ReplyDelete
  2. Very nice Useful Post For All Students.

    ReplyDelete
  3. खूप छान व महत्त्वपूर्ण वाक्य.

    ReplyDelete
  4. खूप छान वाक्य विद्यार्थ्यांसाठी उपयोगी वाक्य.

    ReplyDelete
  5. खूप छान वाक्य विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box.

"English Speaking Practice":

 1. क्या तुम तैयार हो? Are you ready?  2. तुम क्या कर रहे हो? What are you doing? 3. क्या तुमने खाना खा लिया? Did you eat your meal? 4. क्या...