This That These आणि Those चा वापर
This and That
This (धिस) हा,ही,हे
That (दॅट) तो,ती,ते
👉When you point to something near you,you should use the word this.
👉जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या गोष्टीकडे निर्देश करता तेव्हा तुम्ही (this)हा शब्द वापरला पाहिजे.
1. This is a bag.
(ही एक पिशवी आहे.)
2. This is a ball.
(हा एक चेंडू आहे.)
3. This is a bat.
(ही खेळण्याची लाकडी फळी आहे.)
4. This is a bee.
(ही मधमाशी आहे.)
5. This is a bird.
(हा एक पक्षी आहे.)
6. This is a butterfly.
(हे फुलपाखरू आहे.)
7. This is a cat.
(ही एक मांजर आहे.)
8. This is a cow.
(ही गाय आहे.)
9. This is a cup.
(हा एक कप आहे.)
10. This is a dog.
(हा कुत्रा आहे.)
11. This is a fan.
(हा पंखा आहे.)
12. This is a hat.
(ही टोपी आहे.)
13. This is a horse.
(हा घोडा आहे.)
14. This is a leaf.
(हे एक पान आहे.)
15. This is a man.
(हा एक माणूस आहे.)
16. This is a mat.
(ही चटई आहे.)
17. This is a comb.
(हा कंगवा आहे.)
18. This is a parrot.
(हा पोपट आहे.)
19. This is a book.
(हे पुस्तक आहे.)
20. This is a rabbit.
(हा ससा आहे.)
21. This is a rat.
(हा उंदीर आहे.)
22. This is a top.
(हा भोवरा आहे.)
23. This is a ring.
(ही एक अंगठी आहे.)
That (दॅट) तो,ती,ते
👉When you point to something far away from you,you should use the word that.
Ø 👉(जेव्हा तुम्ही तुमच्यापासून दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे निर्देश करता तेव्हा तुम्ही (that) हा शब्द वापरला पाहिजे.)
1. That is a ball.
(तो एक चेंडू आहे.)
2. That is a bench.
(तो एक बाक आहे.)
3. That is a car.
(ती एक कार आहे.)
4. That is a cow.
(ती एक गाय आहे.)
5. That is a dog.
(तो कुत्रा आहे.)
6. That is a door.
(तो दरवाजा आहे.)
7. That is a donkey.
(ते एक गाढव आहे.)
8. That is a girl.
(ती एक मुलगी आहे.)
9. That is a hat.
(ती टोपी आहे.)
10. That is a hen.
(ती कोंबडी आहे.)
11. That is a horse.
(तो घोडा आहे.)
12. That is a jug.
(तो एक जग आहे.)
13. That is a man.
(तो एक माणूस आहे.)
14. That is a net.
(ते जाळे आहे.)
15. That is a parrot.
(तो पोपट आहे.)
16. That is a rabbit.
(तो ससा आहे.)
17. That is a squirrel.
(ती एक खार आहे.)
18. That is a towel.
(तो एक टॉवेल आहे.)
19. That is a tree.
(ते एक झाड आहे,)
These and Those
These (दीज) या,ह्या,ही,हे
Those (दोज) त्या,ते,ती
👉When we point to many things that are nearby,we use these.
👉(जेव्हा आपण जवळपास असलेल्या अनेक गोष्टींकडे लक्ष वेधतो तेव्हा आपण (these) चा वापर करतो.)
1. These are bags.
(ह्या पिशव्या आहेत.)
2. These are balls.
(हे चेंडू आहेत.)
3. These are birds.
(हे पक्षी आहेत.)
4. These are boys.
(ही मुलं आहेत.)
5. These are cars.
(ह्या कार आहेत.)
6. These are cats.
(या मांजरी आहेत.)
7. These are ducks.
(ही बदके आहेत.)
8. These are fans.
(हे पंखे आहेत.)
9. These are girls.
(ह्या मुली आहेत.)
10. These are hats.
(ह्या टोप्या आहेत.)
11. These are mats.
(ह्या चटया आहेत.)
12. These are pens.
(हे पेन आहेत.)
13. These are pins.
(ह्या टाचण्या आहेत.)
14. These are rabbits.
(हे ससे आहेत.)
15. These are trees.
(ही झाडे आहेत.)
Those (दोज) त्या,ती,ते
👉When we point to many things that are far away,we use those.
👉(जेव्हा आपण दूर असलेल्या अनेक गोष्टींकडे लक्ष वेधतो तेव्हा आपण (those) चा वापर करतो.)
1. Those are balloons.
(ते फुगे आहेत.)
2. Those are books.
(ती पुस्तके आहेत.)
3. Those are boys.
(ती मुलं आहेत.)
4. Those are doors.
(ते दरवाजे आहेत.)
5. Those are ducks.
(ती बदके आहेत.)
6. Those are eggs.
(ती अंडी आहेत.)
7. Those are flowers.
(ती फुलं आहेत.)
8. Those are girls.
(त्या मुली आहेत.)
9. Those are hens.
(त्या कोंबड्या आहेत.)
10. Those are nets.
(ते जाळे आहेत.)
11. Those are pencils.
(त्या पेन्सिल आहेत.)
12. Those are pups.
(ती कुत्र्याची पिल्लं आहेत.)
13. Those are rabbits.
(ते ससे आहेत.)
👉आपल्यापासून जवळ असलेली एक वस्तू दाखवण्यासाठी आपण This चा वापर करतो तर आपल्यापासून दूर असलेली एक वस्तू दाखवण्यासाठी आपण That चा वापर करतो.तसेच आपल्यापासून जवळ असलेल्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी These चा वापर करतो तर आपल्यापासून दूर असलेल्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी Those चा वापर करतो.
यांसारख्या महत्त्वपूर्ण माहितीच्या सचित्र pdf files डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.