लिंग व लिंगाचे प्रकार
ling-and-its-types-marathi-grammar
लिंग – नामाच्या रुपावरून एखादा घटक वास्तविक अथवा काल्पनिक किंवा एखादी व्यक्ती किंवा वस्तू हि पुरुषजातीची (नर)आहे की स्त्रीजातीची (मादी)आहे की दोहोंपैकी कोणत्याही जातीची नाही,हे ज्यावरून कळते;त्याला ‘लिंग’असे म्हणतात.
लिंगाचे तिन प्रकार पडतात.
(१)पुल्लिंग (२)स्त्रीलिंग (३)नपुंसकलिंग
(१)पुल्लिंग – ज्या नामाच्या रुपावरून पुरुषजातीचा बोध होतो,किंवा पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला ‘पुल्लिंग’असे म्हणतात.
जसे – संतोष मैदानात आला.
तो – संतोष. म्हणजेच ‘संतोष’या नामाचे लिंग पुल्लिंग आहे.
शिक्षक,घोडा,पंखा,चिमणा,मुलगा,सूर्य,सागर,कागद,इत्यादी पुल्लिंगी नामे आहेत.
(२) स्त्रीलिंग – ज्या नामाच्या रूपावरुन स्त्रीजातीचा बोध होतो,किंवा स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना ‘स्त्रीलिंग’ असे म्हणतात.
जसे-तिची वही सापडली.
ती – वही . म्हणजेच ‘वही’या नामाचे लिंग स्त्रीलिंग आहे.
शिक्षिका,घोडी,चिमणी,शाळा,मुलगी,वही,खिडकी इत्यादी नामे स्त्रीलिंगी आहेत.
(३) नपुंसकलिंग – ज्या नामाच्या रूपावरुन पुरुषजातीचा किंवा स्त्रीजातीचा बोध होत नाही ,किंवा एखाद्या नामावरून नर अथवा मादी असा कोणताच बोध होत नसेल तर ते ‘नपुंसकलिंगी ’असे मानतात.
जसे – बागेत फुले उमलली.
ते – फूल. म्हणजेच ‘फूल’या नामाचे लिंग नपुंसकलिंग आहे.
घडयाळ,पुस्तक,वाहन,शहर,लेकरू,पाखरू,घर,मूल,वासरू,केळे,मडके,खेडे इत्यादी नामे नपुंसकलिंगी आहेत.
लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे मगच त्याचे लिंग ओळखावे.
पुल्लिंगी नामाचा उल्लेख ‘तो’या शब्दाने केला जातो.
स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ‘ती’या शब्दाने केला जातो.
नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ‘ते’या शब्दाने केला जातो.
उदा. तो घोडा,तो कावळा,तो ढग,तो चांगुलपणा इत्यादी पुल्लिंगी नामे आहेत.
ती सायकल,ती नदी,ती मुलगी ,ती हुशारी इत्यादी स्त्रीलिंगी नामे आहेत.
ते मुल,ते झाड,ते शेत,ते धैर्य इत्यादी नपुंसकलिंगी नामे आहेत.
काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ठरावीक पद्धतीने होतात. जसे -
पुल्लिंगी स्त्रीलिंगी
माळी माळीण
देव देवी
तरुण तरुणी
वाघ्या मुरळी
कोकीळ कोकीळा
शिक्षक शिक्षिका
सासरा सासू
नातू नात
कुत्रा कुत्री
साधू साध्वी
पाटील पाटलीण
चिमणा चिमणी
कोळी कोळीण
पोपट मैना
गायक गायिका
राजा राणी
वाघ वाघीण
व्याही विहीण
बालक बालिका
लेखक लेखिका
प्राध्यापक प्राध्यापिका
आजोबा आजी
गवळी गवळण
पती पत्नी
काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्रपणे होतात.
पुल्लिंगी स्त्रीलिंगी
पुत्र कन्या
वर वधू
पिता माता
मोर लांडोर
बोकड शेळी
वडील आई
भाऊ बहीण
बोका भाटी
दीर जाऊ
विद्वान विदुषी
उंट सांडणी
बैल गाय
नवरा बायको
काही संजीवांची नामे आणि त्यांचे लिंग
पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग
तो – मुलगा ती – मुलगी ते – मूल
तो – कुत्रा ती – कुत्री ते – पिल्लू
तो – घोडा ती – घोडी ते - शिंगरु
तो – बैल ती – गाय ते – वासरू
तो – मेंढा ती – मेंढी ते – मेंढरू
तो – चिमणा ती – चिमणी ते – पाखरू
तो – आंबा ती – पपई ते – केळे
तो – चंद्र ती – चांदणी ते – चांदणे
तो – भात ती – भाजी ते – वरण
तो – अंगठा ती – करंगळी ते – बोट
तो – बगीचा ती – बाग ते – फूल
तो – वृक्ष ती – फांदी ते – झाड
तो – देश ती – मातृभूमी ते – राष्ट्र
तो – फळा ती – शाळा ते – पुस्तक
तो – समुद्र ती – लाट ते – पाणी
तो – प्रकाश ती – सावली ते – ऊन
तो – डोंगर ती – दरी ते – टेकाड
तो – सूर्य ती – मेणबत्ती ते – तेज
लिंग व त्याचे प्रकार याची Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
खूप छान सुंदर माहिती.
ReplyDelete