Saturday, May 6, 2023

Proverbs (म्हणी)

 Proverbs (म्हणी)

english-proverbs-with-marathi-meaning
english-proverbs-with-marathi-meaning

 

1)     All's well that ends well.-ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड.

2)     A day after the fair.- वरातीमागून घोडे.

3)     Appearances can be deceptive. - दिसते तसे नसते म्हणून जग फसते.

4)     All work and no play makes Jack a dull boy . -कष्टाबरोबर विरंगुळाही आवश्यक आहे.

5)     A friend in need is a friend indeed- संकटाच्या वेळी/गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच मित्र.

6)     Absence makes the heart grow fonder. -विरह,अभाव किंवा अनुपस्थितीमुळे एखाद्या गोष्टीची गोडी वाढते.

7)     A new broom sweeps clean.-नव्या दमाने काम करणाऱ्या माणसाकडून जास्त काम होते.

8)     Actions speak louder than words.-कृती ही शब्दापेक्षा अधिक प्रभावी असते.

9)     All that glitters is not gold. -चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते.

10)   A stitch in time saves nine.-वेळेत काम केल्याने पुढे होणारा त्रास वाचतो.

11)   A rolling stone gathers no mass-. एक ना धड भाराभर चिंध्या.  

12)   All Roads lead to Rome. -सर्व रस्ते रोमकडे जातात.

13)  Bad news travels fast.-वाईट बातम्या झपाट्याने पसरतात.

14)  Beauty is in the eye of the beholder.- सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

15)  Better late than never.- चांगली गोष्ट करायला कधीच उशीर झालेला नसतो.

16)  Barking dogs seldom bite.- बोलेल तो करेल काय,गरजेल तो वर्षेल काय?

17)  Charity begins at home - सत्कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी.

18)  Cut your coat according to your cloth.- अंथरूण पाहून हातपाय पसरावे.

19)  Don't cross a bridge until you come to it. - अडचण यायच्या आधीच तिची काळजी करू नका.

20)  Don't put all your eggs in one basket.- एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका.

21)   Don't put the cart before the horse.- कार्यकारणभावाचे भान ठेवा.

22)  Don't make a mountain out of a mole hill.-राईचा पहाड करू नका.

23)  Don't count your chickens till they are hatched .- काम पूर्ण होईपर्यंत ते पूर्ण झाले आहे असे म्हणू नका.

24)  Every dog has his day.- प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला काळ येतो.

25)  Every cloud has a silver lining. - वाइटातून चांगले निघते.

26)  Forbidden fruit is sweetest.-चोरून केलेले कृत्य जास्त गोड वाटते.

27)  Fine feathers make fine birds.शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.

28)  Fools rush in where angels fear to tread.-मूर्ख लोक विचार न करता कृती करतात.

29)  First come first served.-हाजीर तो वजीर.

30)  Health is wealth.- आरोग्य हीच खरी संपत्ती.

31)   Honesty is the best policy- सत्यमेव जयते.

32)   It never rains but it pours.-संकटे आली,की मोठ्या प्रमाणात येतात.

33)   It's no use crying over spilt – milk.-पश्चातबुद्धी कामाची नाही.

34)   Look before you leap.- प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे.

35)   Man proposes,God disposes.- मनुष्य ठरवतो एक, होते दुसरे.

36)   Money makes the mare go.- दाम करी काम.

37)   More haste less speed.-घाई केल्यामुळे काम लवकर पूर्ण होत नाहीच,पण चुका निस्तराव्या लागल्याने विलंब लागतो.

38)   Make hay while the Sun shines.-योग्य वेळी काम पार पाडा,वाहत्या गंगेत हात धुऊन घ्या.

39)  Might is right.-बळी तो कान पिळी.

40)  Nothing succeeds like success.-एकदा यश मिळाले,की यश मिळतच जाते.

41)   Necessity is the mother of invention.-गरज ही शोधाची जननी असते.

42)  No gain without pain.- कष्टाशिवाय फळ नाही.

43)  One man's meat is another man's poison.-एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडणार नाही.

44)  Out of sight , out of mind.-वस्तू नजरेसमोरून दूर झाल्यावर तिचा विसर पडतो.

45)   One good turn deserves another.-दुसऱ्याच्या सत्कार्याचे कौतुक करू नका,त्याचे अनुसरण करा.

46)  Prevention is better than cure.-खबरदारी ही उपायापेक्षा चांगली.

47)  Rome was not built in a day. कोणतीही गोष्ट यथावकाशच पूर्ण होते.

48)  Say a little and say it well.-थोडे बोला आणि ते चांगले बोला.

49)  Slow and steady wins the race .- शांत,स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो.

50)   Still water runs deep.-खोल पाणी संथपणे वाहते.

51)   Strike while the iron is hot.-परिस्थिती अनुकूल असताना काम करावे.

52)   Simple living and high thinking.-साधी राहणी,उच्च विचारसरणी.

53)   To add fule to the fire.-आगीत तेल ओतणे.

54)   The wearer knows where the shoe pinches.- ज्याचे जळते त्याला कळते.

55)   To give onself airs.- तोरा मिरवणे,दिमाख करणे.

56)   The hand that rocks the cradle rules the world .-जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी.

57)   The doctor after death- बैल गेला नि झोपा केला.

58)   Tit for Tat / Eye for an eye.( and a tooth for a tooth ) - जशात तसे.

59)  The child is father of man.- बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

60)   It's never too late to mend. - चूक सुधारायला कधीच उशीर झालेला नसतो.

61)   That's the way the cookie crumbles.- हीच जगाची रीत आहे.

62)  The early bird catches the worm. - वेळच्या वेळी काम करणाऱ्याला लाभ होतो.

63)   There is a time and place for everything.- प्रत्येक गोष्ट करताना काळ व वेळ पाहणे गरजेचे आहे.

64)   Union is strength.- एकी हेच बळ.

65)  You can't eat the cake and have it.- काही मिळविण्यासाठी त्याग करायला लागतो.

66)  Where there's a will there's a way.- इच्छा तेथे मार्ग.

यासारख्या महत्त्वपूर्ण  pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

"English Speaking Practice":

 1. क्या तुम तैयार हो? Are you ready?  2. तुम क्या कर रहे हो? What are you doing? 3. क्या तुमने खाना खा लिया? Did you eat your meal? 4. क्या...